शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
3
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
4
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
5
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
6
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
7
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
8
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
9
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
10
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
11
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
12
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
13
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
14
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
15
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
16
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
17
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
18
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
19
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
20
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."

मानवी साखळीद्वारे कारवाईचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 00:05 IST

कल्याणमध्येही राष्ट्रवादीचे आंदोलन; गुन्हा मागे न घेतल्यास ‘जेल भरो’

कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कल्याणमध्ये पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करून आंदोलन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते कल्याण तहसील कार्यालयापर्यंत ही मानवी साखळी करण्यात आली होती. सूडबुद्धीने दाखल केलेला ईडीचा गुन्हा मागे न घेतल्यास बेमुदत उपोषण आणि जेल भरो आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी राष्ट्रवादीतर्फे देण्यात आला.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना आकसापोटी भाजप सरकारने शरद पवारांविरोधात ईडीचा गुन्हा दाखल केला आहे. सर्वच स्तरावर भाजप सरकार अपयशी ठरले आहे. लोकशाही नेस्तनाबूत करण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. सर्वाेच्च न्यायालयातील न्यायाधीशांनाही मैदानात उतरत सरकारचा निषेध करावा लागला आहे. राज्यघटना बाजूला ठेवून हुकूमशाही लादण्याचे काम भाजप सरकार करत असून निवडणुकीत विरोधी पक्षांचे नेते आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करीत एक प्रकारे दबावतंत्र अवलंबण्याचे सध्या सुरू असल्याचा आरोप राष्टÑवादीने केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ईडी कारवाईप्रकरणी सरकारचा निषेध म्हणून शिष्टमंडळाने तहसील कार्यालयात निवेदन दिले. आंदोलनात पक्षाचे प्रदेश महासचिव पारसनाथ तिवारी, जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, वल्ली राजन, अ‍ॅड. प्रल्हाद भिल्लारे, जव्वाद डोन, जे.सी. कटारिया, समीर वानखेडे, संदीप देसाई, प्रवीण मुसळे, श्याम आवारे, रामदास पाटील, रेखा सोनवणे, विनया पाटील आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय