शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून डोंबिवलीतील शिक्षिकेवर ठाण्यात लैंगिक अत्याचार : आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:07 IST

डोंबिवलीतील शिक्षिकेवर लग्नाचे अमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार करणा-या सुरज सूर्यवंशीला कासारवडवली पोलिसांनी मंगळवारी अटक केली. चाकूचा धाक दाखवून मारहाण करून डोक्यात दगड टाकण्याचीही त्याने तिला धमकी दिली होती.

ठळक मुद्देशादी डॉट कॉम या संकेतस्थळावरुन दोघांची ओळखआॅगस्ट २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या काळात अनेकदा केले अत्याचारनौपाडयातून कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग

ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून डोंबिवलीतील एका खासगी क्लासेसच्या २५ वर्षीय शिक्षिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार करणा-या सुरज दिनकर सूर्यवंशी (२६, रा. रघुनाथनगर, वागळे इस्टेट, ठाणे) याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.‘शादी डॉट कॉम’ या संकेतस्थळामार्फत पीडित शिक्षिकेची सुरज याच्याशी मे २०१७ मध्ये ओळख झाली. याच संकेतस्थळावरून त्याने मोबाइल क्रमांक घेऊन तिला फोन आणि मेसेज करण्यास सुरुवात केली. यातूनच दोघांमध्ये मैत्री झाल्यानंतर त्याने तिच्या आईवडिलांशीही बोलणे करून आम्ही लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले. आॅगस्ट २०१७ मध्ये त्याने तिला ठाण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकीवर फिरवले. विश्वास संपादन केल्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून ओवळानाका येथील एका लॉजवर नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवले. त्यानंतरही १८ नोव्हेंबर २०१७ आणि ५ जानेवारी २०१८ रोजी त्याने अशाच प्रकारे लग्नाच्या भूलथापा देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पुढे लग्नाचा विषय काढल्यावर मात्र तो तिला टाळाटाळ करू लागला. तिच्या आईवडिलांनी त्याला याचा जाब विचारल्यानंतर त्याने अखेर डिसेंबर २०१७ मध्ये लग्न करण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात ५ मार्च २०१८ पर्यंत त्याने वेगवेगळ्या कारणांनी तिची फसवणूक केली. दरम्यानच्या काळात जानेवारी २०१८ मध्ये शिवीगाळ करून दोघे आंतरजातीय असल्यामुळे त्याने तिला लग्नाला नकार दिला. तर, १२ फेब्रुवारी २०१८ रोजी मुलुंड चेकनाका येथे त्याने चाकूचा धाक दाखवून मारहाण करून डोक्यात दगड टाकण्याचीही धमकी दिली, अशी तक्रार तिने नौपाडा पोलीस ठाण्यात ६ मार्च रोजी रात्री दाखल केली. तिच्यावर अत्याचाराचा संपूर्ण प्रकार हा कासारवडवली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील परिसरात घडलेला असल्यामुळे हे प्रकरण आता कासारवडवली पोलिसांकडे वर्ग केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले. सुरज सूर्यवंशी याला अटक केल्याची माहिती कासारवडवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले यांनी दिली. महिला उपनिरीक्षक आर.बी. रत्ने याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :thaneठाणेRapeबलात्कारCrimeगुन्हा