शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांच्या मैदानावर खाजगी शाळेचा 'खेळ', न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलला आरक्षित भूखंड आंदण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 16:54 IST

Thane News : सर्वसामान्य ठाणेकरांसाठी आरक्षित असलेल्या मैदानाचा भूखंड वसंत लॉन्स गृहसंकुलाजवळील न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलने खाजगी वापर केला आहे.

ठाणे -  सर्वसामान्य ठाणेकरांसाठी आरक्षित असलेल्या मैदानाचा भूखंड वसंत लॉन्स गृहसंकुलाजवळील न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलने खाजगी वापर केला आहे. या परिसरात मैदान नसल्याने लहान मुलांना रस्त्यावर खेळावे लागते. तसेच नागरिकांना जॉगिंगसाठी उपवन तलावाचा रस्ता धरावा लागतो. एकीकडे बच्चे कंपनीच्या ऑनलाईन खेळावरून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच परिसरातील मैदानावर खासगी शाळांचा 'खेळ' सुरु असेल, तर मनसेकडून उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

ठाणे महानगरपालिकेच्या मंजूर विकास आराखडयानुसार वसंत लॉन्सजवळील न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलशेजारी ६६००  चौमी (१.६१ एकर) क्षेत्रफळाचे खेळाचे मैदान नियोजित आहे. या मैदानाला शाळेने संरक्षित भिंत उभारून ते बंदिस्त केले आहे. दुसरीकडे गांधीनगर, सुभाषनगर, माजिवडा गाव, साईनाथ नगर, चिरागनगर, हरदासनगर या मध्यमवर्गीय लोकवस्तीमधील मुलांना त्यांच्या हक्काचे खेळाचे मैदान खुले नसल्याने रस्त्यावरच खेळाचा 'डाव' मांडावा लागतो. पालकांना मुलांनी पबजीसारखे ऑनलाईन गेम खेळू नये व मैदानी खेळ खेळावेत असे वाटते. परंतु मैदानच जर खुले नसेल तर मुलांनी करायचे काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. या जागेवर न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलने अतिक्रमण केलेले आहे. पालिकेच्या शहर विकास विभागामार्फत याबाबत स्पष्ट निर्देश असताना देखील शाळेने मैदानाचा वापर स्वत: करिता केलेला आहे. तसेच मैदान ठाणे पालिकेस हस्तांतरित केलेले नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसात मैदान सर्वसामान्यांसाठी खुले न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा दणका दिला जाईल, अशा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी दिला आहे. याबाबत पाचंगे यांनी ठाणे महापालिका आयुक्त, महापौर, शिक्षण समिती सभापती आणि न्यू होरायझन स्कॉलर्स शाळेच्या व्यवस्थापनाशी पत्रव्यव्हार केला असून मैदान स्थानिकांच्या हक्काचे आहे ते तात्काळ खुले करावे, अशी मागणी पाचंगे यांनी केली आहे.  उच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली खेळाच्या मैदानाबाबत उच्च न्यायालयाने देखील वेळोवेळी सार्वजनिक मालमत्ता असल्याने खाजगी वापर करता येणार असा निर्वाळा दिलेला आहे. मात्र या प्रकरणात त्या आदेशाची पायमल्ली करण्यात आली असून शाळेच्या अशा मनमानी कारभारावर पालिकेने कारवाई करावी, असे संदीप पाचंगे यांनी सांगितले.

टॅग्स :Schoolशाळाthaneठाणे