शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारी झाल्यामुळे खासगी मोटारकार चालकाची ठाण्यात आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2021 23:44 IST

शेअर मार्केटमध्ये झालेला तोटा आणि अंगावरील कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत असलेल्या सुनिल सक्सेना (५०, रा. व्होल्टास कॉलनी, ठाणे) या खासगी मोटारकार चालकाने आपल्याच मोटारीमध्ये हातावर आणि गळयावर ब्लेडचे वार करुन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली.

ठळक मुद्देमोटारीमध्येच मिळाला मृतदेहचिठ्ठीमुळे झाला उलगडा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: शेअर मार्केटमध्ये झालेला तोटा आणि अंगावरील कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत असलेल्या सुनिल सक्सेना (५०, रा. व्होल्टास कॉलनी, ठाणे) या खासगी मोटारकार चालकाने आपल्याच मोटारीमध्ये हातावर आणि गळयावर ब्लेडचे वार करुन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. सुरुवातीला हा घातपाताचा प्रकार असल्याचे पोलिसांसह सर्वांनाच वाटले. मात्र, त्यानेच मागे ठेवलेल्या चिठ्ठीमुळे हा उलगडा झाल्याचे चितळसर पोलिसांनी सांगितले.सुनिल या चालकाचा प्रवासी मोटारकारमध्ये घोडबंदर रोडवरील सत्यम फोर्डच्या शोरुमसमोर रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना टीकुजिनीवाडी जवळील रस्त्यावर घडली. एका बंद कारमध्ये गळयावर आणि हातावर वार केल्याच्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. त्यामुळे रात्रीच कोणीतरी त्याचा खून केल्याची शक्यता वर्तविली जात होती. वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ आणि चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी ही कार ताब्यात घेऊन हा मृतदेह बाहेर काढला. गाडीत मोठया प्रमाणात रक्तही होते. सुरुवातीला हा घातपाताचा प्रकार असल्याचा अंदाज होता. मात्र, व्होल्टास कॉलनी परिसरात राहणाऱ्या सुनिल याला शेअर मार्केटमध्ये मोठया प्रमाणात अपयश आले. त्याला क्रेडिट कार्ड तसेच इतरही काही कर्ज होते. याच विवंचनेतू नैराश्य आल्याने त्याने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे आपल्या चिठ्ठीत म्हटले आहे.* गाडीत पर्स विसरल्याचा केला बहाणा...सुनिल याची पत्नी ठाण्यातील एका शाळेत शिक्षिका असून त्याला २३ आणि १५ वर्षांच्या दोन मुली आहेत. शनिवारी नेहमीप्रमाणे रात्री ८.३० वाजता तो घरी आला. मात्र, आपल्या कारमध्येच पैशांची पर्स विसरल्याचा बहाणा त्याने कुटूंबीयांकडे केला. मात्र, त्यानंतर त्याने आपला मोबाईल बंद केला. रविवारी सकाळीच ११ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह त्याच्या कारमध्ये मिळाल्याचे पोलिसांनी त्याच्या कुटूंबीयांना सांगितले. उत्तरीय तपासणीसाठी त्याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. त्याच्या पर्समध्येच चिठ्ठी तर कारमध्येच ब्लेडही मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र