शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव टप्पा अनुदानासाठी ठाण्यात मुख्याध्यापकांचे आंदाेलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 22:25 IST

...येथील शासकीय विश्रामगृहासमाेर या आंदाेलनकर्त्या मुख्याध्यापकांनी तीव्र निदर्शने केली.

ठाणे : विविध अध्यादेश काढून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आराेप करून या शाळांना विविध समस्या भेडसावत आहेत. या समस्या तत्काळ साेडवाव्या, वाढीव टप्पा अनुदान प्रचलित नियमानुसार देण्यात यावा, १५ मार्च २०२४ चा संच मान्यता शासन आदेश रद्द करावा आदी मागण्यांसाठी जिल्ह्यातील मुख्याध्यापक व शिक्षकांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढून त्यांच्या मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी रूपाली भालके यांना दिले.येथील शासकीय विश्रामगृहासमाेर या आंदाेलनकर्त्या मुख्याध्यापकांनी तीव्र निदर्शने केली. महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना, शिवछत्रपती शिक्षक संघटना व मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा धडक मोर्चा काढून तीव्र निदर्शन शुक्रवारी छेडण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी यांना भेटलेल्या या आंदाेलनकर्त्यांच्या शिष्टमंडळात ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी गणेश पाटील, अनिल पाटील, प्रवीण लोंढे, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष प्रशांत भामरे, शिक्षक क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस, तसेच विलास जाधव, आनंद किंगे, भास्कर नारखेडे, किशोर राठोड, थॉमस सर, भाऊसाहेब पानसरे इत्यादी पदाधिकारी व शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,असे जेष्ठ शिक्षक दिलीप डुंबरे यांनी लाेकमतला सांगितले. यावेळी करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये वाढीव टप्पा अनुदान द्यावे, जुनी पेन्शन जशीच्या तशी लागू करावी, पवित्र पोर्टल द्वारे भरती दर सहा महिन्यांनी करावी, शिक्षकेतर भरती तातडीने करावी आणि १५ मार्च २०२४ चा संच मान्यता शासन आदेश रद्द करावा आदी मागण्यां या मुख्याध्यापक, शिक्षकांनी केल्या.

टॅग्स :thaneठाणेTeacherशिक्षक