शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यातील बेतवडे येथे पालिका उभारणार प्रधानमंत्री आवास योजनेतून ३ हजार घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 13:44 IST

ठाणे - ठाणे महापालिका प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्यात जरी लाभार्थी मिळविणे कठीण असले तरी सुध्दा दुसऱ्या टप्यात मात्र पालिका दिव्यातील बेतवडे येथे तब्बल ३ हजार घरे बांधणार आहे. पीपीपी तत्वावर ही घरे उभारली जाणार असून यातून तीन लाखांपर्यंतचे उत्पन्न असणाºयांना घरे देण्याबरोबरच मध्यम गटासाठीसुध्दा कन्स्ट्रक्शन कॉस्टमध्ये घरे उपलब्ध होणार ...

ठळक मुद्दे३२५ चौरस फुटांचे मिळणार घरपरवडणारी घरेसुध्दा बांधली जाणार

ठाणे - ठाणे महापालिका प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्यात जरी लाभार्थी मिळविणे कठीण असले तरी सुध्दा दुसऱ्या टप्यात मात्र पालिका दिव्यातील बेतवडे येथे तब्बल ३ हजार घरे बांधणार आहे. पीपीपी तत्वावर ही घरे उभारली जाणार असून यातून तीन लाखांपर्यंतचे उत्पन्न असणाºयांना घरे देण्याबरोबरच मध्यम गटासाठीसुध्दा कन्स्ट्रक्शन कॉस्टमध्ये घरे उपलब्ध होणार आहेत.                 ठाणे महापालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरे बांधण्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या योजनेला वेग देण्याचे आदेश संबधींत विभागाला दिले आहेत. त्यानुसार दुसºया टप्यात ३ हजार घरे उपलब्ध होणार आहेत. याअंतर्गत ठाणे महापालिकेच्या शासन मालकी जागेवर बेतवडे सर्व्हे नं. १५, बेतवडे सर्व्हे नं. ७८, डवले गाव व म्हार्ताडी या ४ डीपीआरला तसेच याअंतर्गत ३ हजार सदनिका निर्माण करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून मंजूरी मिळाली आहे. राज्यशासनाकडून महापालिकेस प्राप्त झालेल्या जागेवर या योजना राबविण्यासाठी पीपीपी तत्वावर निविदा काढणे, खाजगी जागेवर भागीदारीद्वारे परवडणारी घरे बांधण्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती मागविणे आणि या योजनेतील चतुर्थ घटकामधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना वयक्तीक स्वरुपात घरकुल बांधण्यास व विस्तारीकरण करण्यास अनुदान प्राप्त होण्यासाठी ठाणे महानगरपालिका अधिकारी व ठामपा सन्माननीय सदस्य यांकरीता मार्गदर्शनार्थ कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. दुसºया टप्यात सुध्दा तीन लाखांची अट ठेवण्यात आली आहे. तीन लाखांचे ज्यांचे वार्षिक उत्पन्न असेल त्यांच्यासाठी ही घरे मोफत असणार आहेत. तर भागीदारी स्वरुपात परडवणारी घरे सुध्दा उभारली जाणार आहेत. यापुढेही जाऊन येथे वाढीव एफएसआय उपलब्ध होणार असल्याने जो विकासक लाभार्थ्यांची आणि परवडणारी घरे उभारणार आहेत, त्यांना कर्मशीअल घरे उभारण्याची संधी सुध्दा पालिका उपलब्ध करुन देणार आहे. परवडणारी घरे ज्यांना घ्यावयाची असतील त्यांच्यासाठी तीन लाखांची अट असणार नाही. परंतु ही घरे त्यांना १२ ते १५ लाखात उपलब्ध होणार असून लाभार्थ्यांची आणि परवडणाºया घरांचे आकारमान हे ३२५ चौरस फुटांचे असणार आहे.ठाणे महापालिकेच्या माध्यमातून दिव्यातील बेतवडे येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३ हजार घरे बांधणार आहे. यासाठी खाजगी विकासकांची मदत घेऊन पीपीपी तत्वावर ही घरे उभारली जाणार आहेत. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाHomeघर