शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘प्राइम केअर’ला नव्हती फायर एनओसी; ठाणे महापालिकेने बजावली होती नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 23:31 IST

आरोग्य विभाग, विभाग कार्यालय आले अडचणीत

ठाणे : बुधवारी पहाटे आग लागलेले मुंब्य्रातील प्राइम क्रिटिकेअर रुग्णालय एका अनधिकृत इमारतीत सुरू असल्याचे आणि त्याला फायर एनओसीच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयाला महापालिकेच्या अग्निशमन विभागाने आग प्रतिबंधक उपाययोजना करण्याची नोटीसही बजावूनही त्यांनी त्या केलेल्या नव्हत्या. यामुळे रुग्णालय प्रशासनासह ठामपाचा आरोग्य विभाग, विभाग कार्यालयासह संबंधित विभागाचे अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बुधवारी पहाटे ३.४० वाजेच्या सुमारास इमारतीच्या मीटर पॅनलमध्ये ही आग लागली. आयसीयूमध्ये सुदैवाने ती पसरली नाही; परंतु पहिल्या मजल्यापर्यंत ती पोहचल्याचे दिसून आले. त्यातही हे संपूर्ण रुग्णालय वातानुकूलित असल्याचेही पाहणीत दिसले आहे. तरी ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यातही या रुग्णालयाला एकच जिना होता. दुसरा जिना हा रॅम्पच्या स्वरूपात होता. त्यातही ते अनधिकृत इमारतीत उभारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

याशिवाय या रुग्णालयाकडे कोणत्याही स्वरूपाची फायर एनओसी नव्हती. त्यामुळे कमी जागेत हे रुग्णालय सुरू होते. रुग्णालयात २० रुग्ण उपचारासाठी दाखल होते. त्यातील ६ रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. दुसरीकडे या रुग्णालयाला आग प्रतिबंधक उपाययोजना करण्याची नोटीस महापालिकेच्या अग्निशमन विभागाने बजावूनही त्याकडे देखील दुर्लक्ष करून कोणत्याही प्रकारची आग प्रतिबंधक उपाययोजनाच केली नसल्याची माहिती समोर आली आहे.

पाणी, वीजजोडणी दिली कोणी?अनधिकृत इमारतीत हे रुग्णालय सुरू असून त्याला आरोग्य विभागाने कशी काय परवानगी दिली, पाणी जोडणी कुणी दिली, विभाग कार्यालयाने याकडे कसे काय दुर्लक्ष केले, महावितरण, टोरंट वीज कंपनीने अनधिकृत इमारतीतील रुग्णालयास कशी काय वीजजोडणी दिली, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे चौकशी झाल्यास हे सर्व विभाग अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सर्व रुग्णालयांचे फायर,  स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश

 येथील प्राइम क्रिटीकेअर रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रत्येक रुग्णालयाचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट लवकरात लवकर करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री तथा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी आग लागलेल्या रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त विपीन शर्मा यांना दिले. तसेच ही आग नक्की कशामुळे लागली, याचा शोध घेण्याचेदेखील आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

‘मुंब्रा आगप्रकरणी  दोषींवर कारवाई करा’मुंब्रा येथील ‘प्राइम’ रुग्णालयामध्ये भीषण आगीमध्ये चार रुग्णांच्या मृत्यूची घटना ही दुर्दैवी असून अभाविप कोंकण मृत पावलेल्या रुग्णांच्या परिवाराप्रति सहानुभूती व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी फक्त मदतीची घोषणा न करता आरोग्य यंत्रणेवरही लक्ष ठेवावे, अशी मागणी केली आहे. या रुग्णालयाने अग्निसुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती का ? तसेच आगीचे कारण याचा योग्य तो तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी, असे अभाविपने आपल्या मागणीत म्हटले आहे.

संबंधित रुग्णालयाकडे फायर एनओसी नव्हती. तसेच आग प्रतिबंधक उपाययोजना करण्याची नोटीसही त्यांना बजावण्यात आली होती; परंतु त्यांच्याकडून याची अंमलबजावणी झाली नाही.- गिरीश झळके, मुख्य अग्निशमन अधिकारी, ठामपा

टॅग्स :fireआगthaneठाणे