शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

श्रावण महोत्सव २०१८ पाककला स्पर्धेची प्राथमिक फेरी डोंबिवलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 03:39 IST

दोन वर्षापासून मिती क्रिएशन्सच्या वतीने आयोजित श्रावण महोत्सव या पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही राज्यस्तरावर विविध दहा शहरांमध्ये ही स्पर्धा होणार आहे.

ठाणे : दोन वर्षापासून मिती क्रिएशन्सच्या वतीने आयोजित श्रावण महोत्सव या पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही राज्यस्तरावर विविध दहा शहरांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी डोंबिवलीत गुरूवार १६ आॅगस्ट रोजी आयोजिण्यात आली आहे. लोकमत सखीमंच याचे माध्यम प्रायोजक आहे.मातोश्री महिला प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने आदित्य मंगल कार्यालय, डोंबिवली स्टेशन पूर्व येथे १६ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजता ही प्राथमिक फेरी पार पडणार आहे. या कार्यक्रमाला खासदार श्रीकांत शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. तुषार प्रीती देशमुख (शेफ) आणि उत्तरा मोने हे या स्पर्धेचे परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.पाच विजेत्या महिलांना विविध स्वरुपाची आर्कषक बक्षीसे मिळणार आहेत. स्पर्धकांव्यतिरिक्त तर यावेळी उपस्थित असणाऱ्या महिलांसाठीसुध्दा लकी ड्रॉ स्पर्धा घेतली जाणार आहे. त्यातूनही अनेक बक्षिसे जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे. लोकमत सखीमंचच्या सदस्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.या स्पर्धेची अंतिम फेरी ८ सप्टेंबर २०१८ रोजी मुंबईतील कोकणेज कोहीनूर या हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या किचनमध्ये होणार आहे. तर या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा ९ सप्टेंबर रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्टÑीय स्मारक, दादर येथे दुपारी ३ वाजता संपन्न होणार आहे. विजेत्या किचन क्वीनला केसरीची माय फेअर लेडी ही टूरदेखील मिळणार आहे. त्यामुळेच या स्पर्धेची किचन क्वीन कोण होणार हे महाअंतिम सोहळ्यातच जाहीर होणार आहे. डोंबिवली येथील प्राथमिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कविता गावंड यांच्याशी ९८१९९६३३४८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मिती ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालक आणि संस्थापक उत्तरा मोने यांनी केले आहे. जास्तीत जास्त महिलांनी ह्या स्पर्धेत भाग घ्यावा व उपस्थित रहावे असे आवाहन लोकमत सखीमंच आणि मिती क्रिएशन्सतर्फे करण्यात आले आहे.‘मक्यापासून बनवलेला एक पदार्थ’ असा या स्पर्धेचा विषय असणार आहे. त्यानुसार हा पदार्थ महिलांनी घरीच बनवून आणायचा आहे. विविध विभागातून झालेल्या प्राथमिक फेरीत प्रत्येक शहरातून ५ महिलांची निवड होणार आहे.

टॅग्स :LokmatलोकमतLokmat Eventलोकमत इव्हेंट