शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीकर असल्याचा अभिमान - कुशल बद्रिके

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 20:31 IST

मनोरंजनाबरोबरच कला आणि क्रीडा क्षेत्रात डोंबिवलीतील हरहुन्नरी रत्ने चमकत असून डोंबिवलीचा झेंडा अटकेपार पोचवत आहेत हे खरोखरच गौरवास्पद आहे. या सुसंस्कृत शहरात आपण राहत असल्याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे गौरवोद्गार प्रख्यात कलाकार कुशल बद्रिके याने काढले.

डोंबिवली - मनोरंजनाबरोबरच कला आणि क्रीडा क्षेत्रात डोंबिवलीतील हरहुन्नरी रत्ने चमकत असून डोंबिवलीचा झेंडा अटकेपार पोचवत आहेत हे खरोखरच गौरवास्पद आहे. या सुसंस्कृत शहरात आपण राहत असल्याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे गौरवोद्गार प्रख्यात कलाकार कुशल बद्रिके याने काढले. डोंबिवलीतील स्पोर्ट्स अकॉर्ड फाउंडेशनच्या वतीने ४ मे ते १९ मे या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी शिबिराची सांगता बद्रिके यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी एशियन चाम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या ईश्वरी शिरोडकर आणि अमेय शिंदे या खेळाडूंचा बद्रिके यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.डोंबिवलीतील खेळाडूना व्यासपीठ आणि संधी मिळवून देण्यासाठी डॉ. मिलिंद शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या स्पोर्ट्स अकॉर्ड फाउंडेशन या संस्थेकडून जिम्नॅस्टिक्स, बडमिंटन,अथलेटीक्स, स्विमिंग आणि योगा या खेळाचे प्रशिक्षित प्रशिक्षका कडून मार्गदर्शन केले जात असून या संस्थेत ५० पेक्षा जास्त खेळाडू दररोज सराव करतात. यात २० खेळाडू जिम्नॅस्टिक्सचा सराव करत असून त्यांना सतीश पाटील आणि प्रसाद दारवेकर या प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन केले जाते. या संस्थेचे खेळाडू असलेल्या ईश्वरी शिरोडकर आणि अमेय शिंदे यांनी यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी करताना इसाक फेडरेशन मार्फत खेळलेल्या इंडियन ओपन स्पर्धेत देखील सुवर्ण आणि रौप्य पदकावर नाव कोरले होते. या खेळाडूसह डोंबिवलीतील इतर खेळाडूना संस्थेची माहिती व्हावी आणि उन्हाळी शिबिराचा आस्वाद घेता यावा या उद्देशाने संस्थेने डोंबिवलीतील सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलातील बंदिस्त सभागृहात आयोजित केलेल्या उन्हाळी शिबिराला खेळाडूचा चांगला प्रतिसाद लाभला होता. यावेळी फाउडेशनचे अध्यक्ष डॉ.मिलिंद शिरोडकर, जयंत शिंदे, माजी नगरसेवक राजन मराठे, भाजपा साउथ सेल चे अध्यक्ष मोहन नायर, यांच्यासह खेळाडू आणि पालक मोठ्या संखेने उपस्थित होते. या शिबिराची सांगता एम्स रुग्णालयाच्या सभागृहात करण्यात आली यावेळी संस्थेचे विश्वस्त जयंत शिंदे यांनी क्षमता असलेल्या खेळाडूना संधी देण्यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील राहील असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भालचंद्र म्हात्रे यांनी केले. यावेळी शिबिराथीर्ना स्मृतीचीन्हाने गौरविण्यात आले. 

टॅग्स :Kushal bedrikeकुशल बद्रिकेdombivaliडोंबिवली