रंगीत फुलांनी खाल्ला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:38 AM2019-09-01T00:38:03+5:302019-09-01T00:38:31+5:30

दर झाले चौपट । आवक झाली कमी, मागणी मात्र वाढली, अतिवृष्टीचा झाला परिणाम

Prices open with colored flowers | रंगीत फुलांनी खाल्ला भाव

रंगीत फुलांनी खाल्ला भाव

Next

ठाणे : गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी फुलांचे दर वाढतात. परंतु, यंदा झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम फुलांच्या आवकवर झाला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात फुल बाजारात फुलांची आवक कमी असली, तरी उत्सवानिमित्त मागणी भरपूर आहे. फुलांचे दर अव्वाच्या सव्वा वाढले आहेत. रंगीत फुलांना यंदा प्रचंड मागणी असल्याने त्यांचे दर चौपट झाले असल्याचे फुलविक्रेत्यांनी लोकमतला सांगितले.

सोमवारी गणरायाचे आगमन होणार आहे. यानिमित्ताने वीकेण्डला बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली आहे. या उत्सवानिमित्त शेवटची खरेदी असते, ती फुलांची. फुले ही लगेच खराब होत असल्याने त्याची खरेदी शेवटी करण्याकडे भक्तांचा ओढा असतो. श्रावण महिना सुरू झाला की, फुलांच्या दरांत वाढ होते. गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी हे भाव गगनाला भिडतात. यंदा अतिवृष्टीमुळे फुलांची पिके वाहून गेली असल्याने फुलांची आवक कमी झाली आहे. परंतु, फुलांना मागणी भरपूर असल्याचे फुलविक्रेते राजेश रावळ यांनी सांगितले. मोगऱ्याचा दर २००० रुपये प्रतिकिलो आहे. पिवळा गोंडा, केशरी-पिवळा कलकत्त्याला फक्त हारापुरतीच मागणी असते. परंतु, यंदा शेवंती, बिजली, लीली, केवडा यासारख्या रंगीबेरंगी फुलांना प्रचंड मागणी असल्याचे निरीक्षण फुलविक्रेत्यांनी नोंदवले. रविवारी या फुलांचे दर आणखीन वाढण्याची शक्यता रावळ यांनी वर्तवली आहे.

फुलांची नावे फुलांचे दर
पिवळा गोंडा ८० ते १०० रु. किलो
केशरी कलकत्ता १०० ते १२० रु. किलो
पिवळा कलकत्ता १४० रु. किलो
मोगरा २००० रु. किलो
मोगºयाचा गजरा ३० रु.
जाई-जुई १६० रु. किलो
गुलछडी ४०० रु. किलो
पिवळी / सफेद शेवंती ३०० रु. किलो
बिजली २५० रु. किलो
अष्टर ४०० रु. किलो
कापरी १२० रु. किलो
लीली ३० रु. बंडल
केवडा २५० ते ३०० रु. बंडल
हिरवी शेवंती ३०० रु. किलो


फुलांची नावे फुलांचे दर
साधी वेणी ५० ते १०० रु.
गुलछडी वेणी १५० रु.
अबोली वेणी १५० रु.
चाफा ५ रु.
दूर्वा १० रु.
हिरवी सुपारी १० रु.
शमीपत्र १० ते २० रु. जुडी
तुळशी ३० ते ५० रु. बंडल
साधा गुलाब ८० रु. बंडल
चायनीज गुलाब १५० रु. बंडल
कंठी १०० ते ५०० रु.

१०० फुले आली असली, तरी मागणी एक हजार फुलांची आहे, असे प्रमाण यंदा आहे. - राजेश रावळ, फुलविक्रेते
 

Web Title: Prices open with colored flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे