शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

ठाणे आयुक्तालयात २०२७ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:08 IST

५१ जणांना केले हद्दपार । एमपीडीएनुसार एक स्थानबद्ध

जितेंद्र कालेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : लोकसभा निवडणूक निर्भय आणि शांततेच्या वातावरणात पार पडण्यासाठी ठाणे शहर आयुक्तालयातील पाचही परिमंडळांतील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या दोन हजार २७ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर, गंभीर गुन्ह्णांची नोंद असलेल्या ५१ जणांविरुद्ध तडीपारीची कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून (११ मार्च) ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ‘आॅल आउट’ या विशेष मोहिमेंतर्गत अनेक गुन्हेगारांवर वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. संपूर्ण ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, वागळे इस्टेट, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या पाचही परिमंडळांतील ३४ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये वेगवेगळ्या वेळी आणि ठिकाणी नाकाबंदी, प्रतिबंधात्मक कारवाई, कोम्बिंग आॅपरेशन तसेच गुन्हेगारांची पडताळणी करून ही मोहीम राबवण्यात आल्याचे सहपोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी लोकमतला सांगितले.

या कालावधीमध्ये १०९१ वेळा मोक्याच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. कलम १०७ नुसार ११०३, कलम १०९ नुसार ३९२, तर कलम ११० नुसार ५३२ अशा दोन हजार २७ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात आले. महाराष्टÑ पोलीस कायदा ५५ नुसार एकाला कल्याणमधून हद्दपार करण्यात आले. कायदा ५६ नुसार ३७, तर कायदा ५७ नुसार १३ जणांविरुद्ध हद्दपारीची कारवाई केली. यात कलम ५६ नुसार ठाण्यातून नऊ, भिवंडीतून चार, कल्याणमधून १६, उल्हासनगरमधून सात, तर वागळे इस्टेटमधून एकावर हद्दपारीची कारवाई झाली. कलम ५७ नुसार ठाण्यातून दोन, कल्याणमधून आठ आणि उल्हासनगरमधून तिघांना हद्दपार केले आहे. याच काळात ४७ वॉन्टेड गुन्हेगारांना पकडण्यातही पोलिसांना यश आले आहे. यातील ठाण्यातून दोघे, भिवंडीतून एक, कल्याणमधून २९, उल्हासनगरमधून १२, तर वागळे इस्टेट परिमंडळातून तीन वॉन्टेड (पाहिजे असलेले) आरोपींना पकडण्यात आले. तर, १५ फरारी गुन्हेगारांनाही अटक करण्यात आली आहे. यातील ठाणे आणि भिवंडीतून प्रत्येकी एक, कल्याणमधून नऊ तर उल्हासनगरमधून चौघा फरारींना पकडण्यात आले आहे.

याशिवाय, बेकायदेशीरपणे दारूची विक्री करणाऱ्या २६० जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १४ लाख ५८ हजार ८०३ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.याशिवाय, कल्याणमधून तीन देशी कट्टे आणि सहा जिवंत काडतुसे, तलवार, गुप्ती आणि चाकू असा १० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही मोहीम यापुढेही अशीच राबवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

एका विशेष मोहिमेंतर्गत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या दोन हजार २७ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. गंभीर गुन्ह्णांची नोंद असलेल्या ५१ जणांना हद्दपार केले आहे.- मधुकर पांडेय,सहपोलीस आयुक्त, ठाणे शहर