शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अपघात रोखण्यासाठी पोलिसांकडे इंटसेप्टर वाहन, ३०० मीटरपर्यंतचा वेग मोजला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 00:12 IST

मुंबई-नाशिक महामार्गावर होणारे अपघात ही मोठी समस्या असून हा महामार्ग दरवर्षी किती बळी घेणार, असा प्रश्न निर्माण झाला होता.

भातसानगर : मुंबई-नाशिक महामार्गावर होणारे अपघात ही मोठी समस्या असून हा महामार्ग दरवर्षी किती बळी घेणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. ११ महिन्यांत ५३ जणांचे बळी गेले आहेत. हे अपघात कमी करण्यासाठी चेरपोली चौकी महामार्ग पोलिसांना आता अत्याधुनिक वाहन मिळाल्याने अपघात कमी होणार आहेत. इंटसेप्टर वाहन पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाले आहे.महामार्ग पोलीस दलाच्या आधुनिकीकरणांतर्गत मुंबई-नाशिक महामार्गावर असलेल्या चेरपोली चौकीच्या पोलिसांना हे वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे मद्यपी, बेशिस्त वाहनचालक, अतिवेगाने वाहन चालविणारे, नियम मोडणारे वाहनचालक यांच्यावर महामार्ग पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे.स्पीडगन लेझर तंत्रज्ञानावर आधारित असल्याने समोरून जाणाऱ्या कोणत्याही वाहनाचा ३०० मीटर अंतरापर्यंतचा वेग यामध्ये मोजला जातो.तसेच अतिवेगाने वाहन चालविणाऱ्यांबाबत पुरावेही पोलिसांना उपलब्ध होणार आहेत. स्पीडगन, ई-चलन, मद्यपींवर लक्ष ठेवण्यासाठी ब्रेथ अ‍ॅनालायझर यंत्रणा आहे. या ७१ किलोमीटर अंतरावर कोणतीही अत्याधुनिक यंत्रणा नसल्याने हजारो कुटुंबे अपघातांमुळे आज उघड्यावर पडली आहेत. आज जरी आकडा ५३ असला तरी तो केवळ जागेवरील आहे. त्यामुळे तो खूप मोठा आहे. दरदिवशी या रस्त्यांवर अपघात होतात. मात्र, अपघातात जखमी झालेल्यांची कोणतीच काळजी घेतली जात नाही.हे अपघात होऊ नये म्हणून कोणतीही काळजी घेतली जात नसून जखमींवर उपचारासाठी कोणतीच अत्याधुनिक यंत्रणाही नाही. या महामार्गावर पोलीस हवालदार दगडू वाकडे, पुंडलिक भोईर, धनंजय देशमुख, चिंतामण शिंदे, संतोष चव्हाण हे या यंत्रणेद्वारे लक्ष ठेवणार आहेत. याचा निश्चितच उपयोग होईल असा विश्वास पोलिसांच्यावतीने व्यक्त करण्यात आले आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस