शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी लागल्याची बतावणी करीत जबरी चोरीसाठी चोरटयांनी केली मोटारसायकलींची खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 21:27 IST

नोकरी लागल्याची कुटूंबीयांना बतावणी करीत भिवंडीतील दोन तरुणांनी चक्क मोबाईलच्या जबरी चोरीसाठी नविन मोटारसायकली खरेदी केल्या. ठाण्यातील एका वकील महिलेच्याही मोबाईलची त्यांनी जबरी चोरी केली.

ठळक मुद्देजबरी चोरीच्या आरोपींची कबूलीवकील महिलेच्या मोबाईलचीही जबरी चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: नोकरी लागल्याची कुटूंबीयांना बतावणी करीत भिवंडीतील दोन तरुणांनी चक्क मोबाईलच्या जबरी चोरीसाठी नविन मोटारसायकली खरेदी केल्या. ठाण्यातील एका वकील महिलेच्याही मोबाईलची त्यांनी जबरी चोरी केली. त्यांच्याकडून १६ मोबाईलसह चार लाख दहा हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सोमवारी दिली.ठाणे न्यायालयात वकिली करणाऱ्या रुपाली अंकोलकर (४९, रा. लोटस गावंडबाग, ठाणे) यांचा मोबाईल २२ जुलै २०२१ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास दोन मोटारसायकलस्वारांनी हिसकावल्याची घटना ठाणे जिल्हा रुग्णालयाजवळ घडली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी आणि निरीक्षक बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते यांच्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे या जबरी चोरीच्या प्रकरणात भिवंडीतील अशोकनगर भागातून सागर यादव (२१) आणि हेमंत थानवि (२१) या दोघांना २३ जुलै रोजी अटक केली. त्यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात दोन, नौपाडा परिसरात तीन तर राबोडीतून एक अशा सहा मोबाईलची जबरी चोरी केल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून वकील महिलेच्या मोबाईलसह १६ मोबाईल आणि दोन मोटारसायकली असा चार लाख दहा हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.* आपण स्विगी या खासगी कंपनीत फूड डिलीवरी करण्याचे काम करीत असल्याची त्यांनी आपल्या कुटूंबीयांना बतावणी केली. याच जॉबसाठी मोटारसायकलची गरज असल्याचे सांगून त्यांनी दोन मोटारसायकलींची खरेदी केली. धक्कादायक बाब म्हणजे हेच चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्यांनाही ते चोरीचे वाटू नये, यासाठी त्यांना ते बनावट बिल बनवून देत होते. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे आणि नौपाडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने या जबरी चोरीच्या गुन्हयांची उकल केली.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी