शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस असल्याची बतावणी करून दीड लाखाचे दागिने लुबाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 23:36 IST

पोलीस असल्याची बतावणी करून एका मोटारसायकवरून आलेल्या तीन भामट्यांनी ७२ वर्षीय वृद्धेकडील एक लाख ६५ हजारांचे सोन्याचे दागिने लुबाडल्याची घटना रविवारी सकाळी पारसिकनगर येथे घडली.

ठळक मुद्दे कळवा पोलीस ठाण्यात गुन्हापारसिकनगर येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पोलीस असल्याची बतावणी करून एका मोटारसायकवरून आलेल्या तीन भामट्यांनी ७२ वर्षीय वृद्धेकडील एक लाख ६५ हजारांचे सोन्याचे दागिने लुबाडल्याची घटना रविवारी सकाळी पारसिकनगर येथे घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.पारसिकनगर येथे राहणारी ही वृद्ध महिला २३ मे रोजी सकाळी पावणेसातच्यासुमारास भाजीपाला घेऊन टोरन्ट पॉवर कार्यालयाजवळ असलेल्या शंकर मंदिराच्या समोरील सार्वजनिक रस्त्यावरून पायी घरी जात होती. त्याचवेळी पाठीमागून एका काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून तिघे भामटे तिथे आले. त्यांनी या वृद्धेला आपण पोलीस असल्याची बतावणी करीत तिच्या गळयातील ६६ हजारांचे तीन तोळे वजनाचे दोन पदरी सोन्याचे मंगळसूत्र आणि ९९ हजारांच्या प्रत्येकी दीड तोळे वजनाच्या तीन सोन्याच्या बांगडया असा एक लाख ६५ हजारांचा ऐवज त्यांनी एका वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून ते त्यांच्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवल्याचे भासविले. प्रत्यक्षात ते पिशवीत न ठेवता तिथून पलायन केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या वृद्धेने याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक व्ही. एल. खिलारे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी