शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्याचे सूडचक्र उठले जीवावर, राष्ट्रवादीमुळे गुन्हा : दोघांवरही गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 02:43 IST

आडिवली-ढोकळी प्रभागातील अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याने भाजपाचे अंबिकानगरचे नगरसेवक महेश पाटील यांच्यासह अन्य सात ते आठ जणांविरोधात गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने या दोन कुटुंबातील पूर्ववैमनस्याचे सूडचक्र कोणत्या पातळीवर येऊन ठेपले ते भाजपाच्या नेत्यांना समजले.

कल्याण : आडिवली-ढोकळी प्रभागातील अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याने भाजपाचे अंबिकानगरचे नगरसेवक महेश पाटील यांच्यासह अन्य सात ते आठ जणांविरोधात गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने या दोन कुटुंबातील पूर्ववैमनस्याचे सूडचक्र कोणत्या पातळीवर येऊन ठेपले ते भाजपाच्या नेत्यांना समजले.कुणाल पाटील हे राष्ट्रवादीचे स्थानिक नेते वंडार पाटील यांचे पुतणे आहेत. कुणाल हे अपक्ष नगरसेवक आहेत. परंतु त्यांनी महापालिकेच्या निवडणुकीनंतर भाजपाला पाठिंबा दिल्याने त्यांची भाजपाचे सहयोगी अपक्ष नगरसेवक म्हणून ओळख आहे. कुणाल आणि महेश पाटील यांच्यात पूर्वीपासून वैर आहे. कुणाल यांचा चुलत भाऊ, वंडार पाटील यांचा मुलगी विजय याची २००७ मध्ये हत्या झाली होती. यात महेश पाटील यांचा आरोपी म्हणुन सहभाग होता. याप्रकरणी महेश यांच्यासह अन्य त्यांच्या साथीदारांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला होता.या घटनेला काही वर्षे उलटत नाही तोच महापालिकेच्या नोव्हेंबर २०१५ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीआधी जुलै महिन्यात ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने आठ जणांना अटक केली होती. उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेले शार्पशूटर्स सागर्ली गावात राहणारे आणि भाजपाचे तत्कालीन ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील यांची हत्या करण्यासाठी आले होते, अशी माहिती तपासात उघड झाली. पोलिसांनी या आरोपींकडून चार रिव्हॉल्वर हस्तगत केली होती. या हत्येची सुपारी कुणाल पाटील यांनी दिली होती, अशी कबुली अटक आरोपींकडून पोलिसांना देण्यात आली होती. या प्रकरणात कुणाल यांना अटकही झाली होती. आता पुन्हा एकदा महेश पाटील यांनी कुणालच्या हत्येची सुपारी दिल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली.भाजपातून दबाव?महेश पाटील भाजपा नगरसेवक आहेत. एका मंत्र्याच्या जवळचे असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याबाबत साशंकता होती. त्याच पक्षाकडे असलेल्या गृहखात्यातून पोलिसांवर दबाव असल्याचे सांगितले जात होते. मात्र राष्ट्रवादीचे स्थानिक नेते वंडार पाटील आणि भाऊ सुधीर पाटील यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना यांना सांगताच गुन्हा दाखल करणे ग्रामीण पोलिसांना भाग पडल्याची चर्चा आहे.पाटील कुटुंबांनापोलीस संरक्षणमाझ्या हत्येची सुपारी दिल्याचे तपासात समोर आले असले तरी आमच्या कुटुंबालाच संपवायची हल्लेखोरांची योजना होती असे कुणाल पाटील यांचे म्हणणे आहे. पोलीस आयुक्त, उपायुक्त आणि स्थानिक मानपाडा पोलिसांनी आम्हाला पुरेसा बंदोबस्त पुरविला आहे. अटकेतील हल्लेखोर आणि कट रचणाºयांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Crimeगुन्हा