शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवतीला रुग्णालयातून हाकलले, अखेर घरीच दिला बाळाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 01:42 IST

अखेर घरी आल्यावर तिची प्रसूती झाली. बाळबाळंतीण सुखरूप असून अशा बेजबाबदार डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी समाजसेवक शिवाजी रगडे यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.

उल्हासनगर : डॉक्टरांनी प्रसूतीची वेळ आली नसल्याचे कारण देत वेदनेने विव्हळणाऱ्या गर्भवतीला दोनदा हाकलवून लावण्याचा प्रकार शनिवारी मध्यवर्ती रुग्णालयात घडला. अखेर घरी आल्यावर तिची प्रसूती झाली. बाळबाळंतीण सुखरूप असून अशा बेजबाबदार डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी समाजसेवक शिवाजी रगडे यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.उल्हासनगर कॅम्प नं. ३ सम्राट अशोकनगरातील २६ वर्षीय महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्याने शनिवारी सकाळी ६ वाजता ती मध्यवर्ती रुग्णालयात गेली. त्या वेळी डॉक्टरांनी प्रसूतीची वेळ आली नाही, असे सांगून महिलेला घरी पाठविले. लॉकडाउनमुळे वाहन मिळत नसल्याने कसेबसे महिलेने घर गाठले. मात्र दुपारी ३ वाजता पुन्हा वेदना सुरू झाल्याने महिला पुन्हा मध्यवर्ती रुग्णालयात गेली. डॉक्टरांनी तपासणी न करता प्रसूतीची वेळ झाली नसल्याचे कारण सांगून महिलेला घरी हाकलवून दिले. अखेर गर्भवतीने बाळाला जन्म दिला.मध्यवर्ती रुग्णालयात २४ वर्षीय अभियंता तरुणीला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे जीव गेल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आरोग्य संचालक आदींकडे पाठपुरावा केला आहे. मध्यवर्ती रुग्णालयातील शनिवारचा प्रकार उघड झाल्यावर रगडे यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आरोग्य विभागाचे संचालक आदींकडे तक्रारी करून कारवाईची मागणी केली.>...म्हणून दुर्लक्ष झाले असावे : मध्यवर्ती रुग्णालयात अपुरे डॉक्टर व कर्मचारी वर्ग असून काही डॉक्टरांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. त्यामुळे महिलेकडे दुर्लक्ष झाले असावे, असा तर्क लावून चौकशी करण्याचे आश्वासन वैद्यकीय अधिकारी डॉ. जाफर तडवी यांनी दिले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस