शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत गरोदर महिलेची झोळीत प्रसूती; बाळ दगावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 07:07 IST

आदिवासी पाड्यावर रस्ते कधी होणार, आमच्या कुटुंबातील चिमुकल्यांचे जीव जाणे कधी थांबणार, असा संतप्त सवाल येथील नागरिकांकडून केला जात आहे.

नितीन पंडित -भिवंडी : घरोघरी गौरीनिमित्त घरी आलेल्या माहेरवाशिणींचे कोडकौतुक सुरू असताना येथून ३० ते ४० किमी अंतरावर असलेल्या भिवंडी-वाडा मार्गावरील दिघाशी गावातील धर्मीचा पाडा येथील एका गरोदर मातेला मुख्य रस्त्यावर आणून रुग्णालयात नेण्यासाठी रस्त्याची सोय नसल्याने चादरीच्या झोळीतून घेऊन जात असताना झोळीतच या महिलेची प्रसूती होऊन बाळ दगावल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना गुरुवारी घडली. शनिवारी या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे दाहक वास्तव समोर आले.दर्शना महादू फरले असे या दुर्दैवी मातेचे नाव आहे. १ सप्टेंबरला दर्शना यांना प्रसूती वेदना होऊ लागल्या. वज्रेश्वरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यासाठी दिघाशी गावातील स्थानिक नागरिकांनी चादरीची झोळी केली. त्यांना दवाखान्यात नेले जात असताना रस्त्यातच त्यांची प्रसूती झाली. मात्र, दर्शना यांचे बाळ दगावल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी जाहीर केले.

आदिवासी पाड्यावर रस्ते कधी होणार?आदिवासी पाड्यावर रस्ते कधी होणार, आमच्या कुटुंबातील चिमुकल्यांचे जीव जाणे कधी थांबणार, असा संतप्त सवाल येथील नागरिकांकडून केला जात आहे.

मागील वर्षी २२ सप्टेंबर, २०२१ रोजी धर्मी आजी या वृद्ध महिलेचा पाय मोडल्याने त्यांना लोखंडी पलंगावरून औषधोपचारासाठी नेले होते. धर्मी आजी यांच्या नावावरूनच या आदिवासी पाड्याला धर्मीचा पाडा हे नाव पडले. या आदिवासी पाड्यापासून मुख्य रस्त्यापर्यंतचा रस्ता बांधण्याची जुनी मागणी आहे.

मुख्य रस्त्यापासून धर्मीचा पाडा हे अंतर एक ते दीड किलोमीटर असून, रस्ता नसल्याने महिलेला आम्ही झोळीतून घेऊन गेलो. मात्र, रस्त्यातच प्रसूती झाली. दर्शना यांचे बाळ दगावले. गरोदर महिला अथवा रुग्णांना नेहमीच झोळीतून न्यावे लागते.- आदेश रायात, रहिवासी, धर्मीचा पाडा.

गरोदर महिला २४ ऑगस्टला प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आली होती. तिची प्रकृती उत्तम होती, परंतु पाड्यावर जाण्यासाठी रस्ता नसल्याने महिलेस चार दिवस अगोदर रुग्णालयात दाखल होण्याची सूचना केली होती, परंतु घरात तिची लहान मुले असल्याने तिने येणे टाळले. स्थानिक आशासेविका या गरोदर महिलेच्या सतत संपर्कात होती. मात्र, महिलेस अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. वाटेतच तिची प्रसूती झाल्याने महिलेचे बाळ दगावले.- डॉ. माधव कवळे, आरोग्य अधिकारी, वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्र.

आदिवासी पाड्यावर रस्ताच नसल्याने मोठी गैरसोयगरोदर महिला २४ ऑगस्टला प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आली होती. तिची प्रकृती उत्तम होती, परंतु पाड्यावर जाण्यासाठी रस्ता नसल्याने महिलेस चार दिवस अगोदर रुग्णालयात दाखल होण्याची सूचना केली होती, परंतु घरात तिची लहान मुले असल्याने तिने येणे टाळले. स्थानिक आशासेविका या गरोदर महिलेच्या सतत संपर्कात होती. मात्र, महिलेस अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. वाटेतच तिची प्रसूती झाल्याने महिलेचे बाळ दगावले.- डॉ. माधव कवळे, आरोग्य अधिकारी, वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्र.

 

टॅग्स :thaneठाणेWomenमहिलाhospitalहॉस्पिटल