शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

गावदेवी भाजी मंडईतील जागा मर्जीतील महिला बचत गटांच्या घशात पालिकेतील एका अधिकाऱ्याचा प्रताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 18:16 IST

तब्बल १२ वर्षांच्या तपानंतर गावेदवी मंडई खुली झाली आहे. परंतु या मंडइतील जागा आपल्या मर्जीतील महिला बचत गटांना कोणत्याही स्वरुपाचा मोबदला न घेता देण्याचा सपाटा पालिकेतील एका वरीष्ठ पदाच्या अधिकाºयाने लावला आहे.

ठळक मुद्देमंडईचा ताबा घेण्यासाठी पालिकेने भरणा केले सरकारी तिजोरीत 1 कोटी 61 लाखमंडई उभारणीसाठी गेला 12 वर्षाचा काळमहिला बचत गट आणि राज्य सरकारच्या कार्यालयांसाठी फुकटात जागा देण्याचा सपाटा

ठाणे - गावदेवी मंडई ताब्यात घेण्यासाठी सरकारी तिजोरीत १ कोटी ६१ लाखांचा भरणा केल्यानंतर ठाणे महापालिकेने यासाठी ४ कोटी ५८ लाखांचा खर्च करुन मंडईची सुसज्ज इमारत उभारली आहे. यासाठी पालिकेला तब्बल १२ वर्षांचा वनवास सोसावा लागला आहे. असे असतांना आता या इमारतीमधील जागा राज्य सरकारची कार्यालये आणि आपल्या मर्जीतील महिला बचत गटांना देण्याचा सपाटा पालिकेतील एका वरीष्ठ पदाच्या अधिकाºयाने लावल्याची माहिती समोर आली आहे. परंतु यामुळे पालिकेचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत असून या अधिकाऱ्याच्या मनमानी कारभार रोखण्यासाठी भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.ठाणे स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर गावदेवी भाजी मंडई आहे. पूर्वी या ठिकाणी राज्य सरकारच्या अखत्यारीतली काही गोदामे होती. पालिकेने सरकारी तिजोरीत १ कोटी ६१ लाख रु पये भरून ती जागा ताब्यात घेतली. त्यासाठी सरकारने पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना तारेवरची कसरत करावी लागली होती. एका अधिकाऱ्याने तर या कामासाठी मंत्रालयात १५० च्या आसपास हेलपाटे घातले होते. दरम्यान या इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर प्रत्येकी १३ हजार चौरस फुटांचे दोन प्रशस्त हॉल पालिकेला प्राप्त झाले आहेत. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जागा निविदा प्रक्रि या राबवून बाजारभावाने दिल्या तर पालिकेच्या तिजोरीत दरमहा लाखो रु पयांचे उत्पन्न पडू शकणार आहे. मात्र, तसे न करता या जागा फूकटात आंदण दिल्या असल्याची बाब समोर आली आहे.पालिकेने ही इमारत उभारण्यासाठी सव्वा सहा कोटींचा निधी खर्ची केला आहे. त्यानंतरही पहिल्या मजल्यावरील १३ हजार चौरस फुटांपैकी ९ हजार चौरस फूट जागा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कौशल्य विकास परिषदेला देण्यात आली आहे. त्यापोटी पालिकेच्या तिजोरीत एकही पैसा आलेला नाही. या मजल्यावरील उर्वरीत चार हजार चौरस फुट जागेवरही याच संस्थेने आपल्या ताब्यात घेतली आहे. दुसºया मजल्यावरील ३ हजार ५०० चौरस फुटांची जागा उपनिबंधक कार्यालयासाठी कोणत्याही मोबदल्याशिवाय देण्यात आली आहे. उर्वरीत साडे नऊ हजार चौरस फुटांपैकी साडे तीन हजार चौरस फूट जागेसाठी पालिकेने निविदा काढली होती. त्यासाठी तीन निवादा प्राप्त झाल्या होत्या. पालिकेला वार्षिक २० लाख रु पये भाडे देण्याची तयारी दाखिवणाऱ्या कॉम्प्युटेक कंपनीची निविदा मंजूर करून तसा करारही पालिकेने केला. मात्र, आता या कंपनीला दिलेली जागा काढून घेत ९ हजार चौरस फूट जागा एका महिला बतच गट आणि शेतकरी बाजारासाठी देण्याचा घाट पालिकेतील एका अधिकाºयाने घातल्याचे बोलले जात आहे.लोकमान्य नगर येथे पालिकेने सुमारे साडे तीन कोटी रु पय खर्च करून महिला बचत गटांसाठी इमारत उभारलेली आहे. ती हक्काची जागा असताना गावदेवी मैदानातील जागा बचत गटांना देण्याचा हट्ट कशासाठी असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे. कोणताही मोबदला न घेता मार्केटमधील जागा दिल्याने पालिकेचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे याबाबीकडे पालिका आयुक्त लक्ष घालणार का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाtalukaतालुका