शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने ST कामगारांचे शोषणच केले, शरद पवारांच्या पक्षाने विचार करावा; प्रकाश आंबेडकरांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 19:12 IST

हनुमान चालीसा आणि मशिदीवरील भोंग्याच्या बाबतीत जे राजकारण सुरू आहे, त्यावर राज ठाकरेंच्या सभेनंतरच उत्तर देऊ असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : या सरकारने एसटी कामागरांचे शोषणच केले आहे. शरद पवार (Sharad Pawar) हे सत्तेत नाही तर शरद पवार यांचा पक्ष सत्तेत आहे.त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांनी याचा विचार करावा असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात लगावला आहे.कोणाच्याही घरावर हल्ला करणे हे चुकीचेच असून याचा आम्ही निषेधच करतो मात्र एसटी कामगारांची कोर्टात ज्या पद्धतीने बाजू मांडायला पाहिजे होती तशी बाजू मांडली गेली नाही, कोर्टाने एक संधी दिली आहे कामावर रुजू होण्याची , त्यामुळे आपला गिरणी कामगार होण्यापेक्षा एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे असे आवाहनही त्यांनी एसटी कामगारांना यावेळी केली.

ठाणे ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने राष्ट्रपिता ज्योतिराव फुले जयंती महोत्सवाचे आयोजन गडकरी रंगायतन नाट्यगृहात करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते . प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, जेव्हा एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तेव्हा आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता .मात्र तेव्हाच भूमिका आम्ही मांडली होती की तुमचा गिरणी कामगार होऊ देऊ नका, आता कोर्टाने संधी दिली आहे, उर्वरित प्रश्न नंतर सोडवता येतील मात्र आता कामावर रुजू होण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले. शिवनेरीच्या मार्फत ज्यावेळी खाजगीकरण झाले तेव्हाच लढा द्यायला हवा होता, मात्र संपबाबत जर कोर्टात योग्य बाजू मांडली असती तर जेवढं अभय कोर्टाने दिलं आहे आणखी अभय दिले असते असे आंबेडकर म्हणाले.

सदावर्ते यांच्यावरही केली टीका

वकिलांनी केवळ कोर्टात आपली बाजू मांडायची असते, रस्त्यावर बाजू मांडायची नसते, नेते आणि वकील आशा दोन्ही भूमिका एकाच वेळी निभावता येत नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

राज ठाकरे यांच्या सभेनंतर उत्तर देणार

हनुमान चालीसा आणि मशिदीवरील भोंग्याच्या बाबतीत जे राजकारण सुरू आहे त्यावर उद्या राज ठाकरे यांच्या सभेनंतरच आपण उत्तर देऊ असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. बेरोजगार आणि महागाईचे मुद्दे लपवण्यासाठी दंगली घडवल्या जात आहेत. मनमोहन सिंग यांच्या काळात एवढी महागाई वाढली नव्हती.पेट्रोल डिझेलचे दरही 80 रुपयांच्या वर गेले नव्हते.मात्र आजच्या घडीला महागाई बोकाळली असून त्यामुळेच हिंदू मुस्लिम दंगली घडवल्या जात असल्याचे आमचा संशय असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरthaneठाणे