शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या तक्रारीनंतर दखल, अर्ध्या किंमतीत उपलब्ध होणार PPE कीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 19:00 IST

- रूग्णांच्या नातेवाईकांना दिलासा

ठाणे : आधीच कोरोना महामारीने पिचलेल्या गोरगरीब रुग्णांना पीपीई कीट तिप्पट दराने विकून ठाण्यात खासगी रुग्णालयांकडून लूट सुरु होती. या पीपीई कीट घोटाळ्यात मेडीकल चालकही उतरले असून खासगी रुग्णालयांच्या साथीने त्यांनी रुग्णांच्या खिशाला काञी लावण्याचा गोरखधंदा थाटला होता. याप्रकरणी पालिका प्रशासन व एफडीएकडे मनसेने केलेल्या लेखी तक्रारीनंतर या लुटीला चाप बसला असून एफडीएने दिलेल्या निर्देशानुसार अर्ध्या किंमतीत पीपीई किट उपलब्ध होणार असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मनसेच्या पाठपुराव्यामुळेच मोठा दिलासा मिळाला आहे.

ठाण्यातील अंबिकानगर परिसरात असणार्‍या स्वस्तिक हाॅस्पिटलमध्ये ११ ते १७ जूनदरम्यान कोरोना रुग्णावर उपचार करण्यात आले. या रुग्णाच्या एकूण बिलापैकी तब्बल ४९ हजार ३५० रुपये पीपीई किटबाबत लावण्यात आले. याबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्याकडे तक्रार केली. त्यावेळी पाचंगे यांनी अधिक माहिती घेतली असता पीपीई किटचा दर २३५० रूपये इतका आकारण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे या प्रकरणी हाॅस्पिटल व संबधित मेडिकलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पालिका उपायुक्त केळकर आणि अन्न व औषध विभाग परिमंडळ एकच्या सहाय्यक आयुक्त माधुरी पवार यांची भेट घेत निवेदनाद्वारे पाचंगे यांनी केली होती. त्यानुसार एफडीएने मेडीकलची तपासणी केली असून सध्या सबंधित मेडिकल २ हजार रुपये दराचे पीपीई किट १२०० रुपये दराने विकत असल्याचे पाचंगे यांना एफडीएने दिलेल्या पञात नमूद केले आहे.

सर्वच मेडीकलची तपासणी करावीकेवळ तक्रारीनंतर एकाच मेडीकलची तपासणी करुन एफडीएने न थांबता शहरातील विविध मेडीकलची तपासणी केल्यास सत्यता समोर येईल. मनसे याबाबत पाठपुरावा करत असून खासगी रुग्णालय व मेडिकलच्या लुटीचे बळी पडलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी मनसेकडे संपर्क साधावा, याबाबत प्रशासनाकडे योग्य पध्दतीने पाठपुरावा करुन h  न्याय मिळवून दिला जाईल.- संदीप पाचंगे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, विभाग अध्यक्ष (ओवळा माजीवडा)

टॅग्स :MNSमनसेthaneठाणेhospitalहॉस्पिटल