सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेच्या निवडणुकीनंतर आता महापौर पदासाठीची चुरस कमालीची वाढली असून वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक आणि एका अपक्ष नगरसेविकेने शिंदेसेनेला पाठिंबा दिल्याने शिंदेसेनेचा बहुमताचा ४० हा आकडा पूर्ण झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, दुसरीकडे भाजपनेही अद्याप हार मानलेली नसून पडद्यामागे राजकीय हालचालींना वेग आला आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या ७८ जागेसाठी सर्वात्रिक निवडणूक झाली असून बहुमतासाठीची ४० ही जादूही बहुमत मॅजिक फिगर भाजप व शिंदेसेनेला गाठता आला नाही. भाजपचे ३७ तर शिंदेसेना + ओमी टीमचे ३६ नगरसेवक निवडून आले. भाजपा बहुमतासाठी ३ तर शिंदेसेना-ओमी टीम ४ जागेने कमी आहे. त्यांना सत्ता स्थापनासाठी साई पक्ष- ०१, शिंदेसेना समर्थक अपक्ष-१, वंचित बहुजन आघाडीचे -०२, अपक्ष- ०१ यांनी शिंदेसेनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समक्ष पाठिंबा जाहीर केला. तर काँग्रेस पक्षाचा १ नगरसेवक असून त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे.
'किंगमेकर' ठरले वंचित आणि अपक्ष
शिंदेसेनेने राजकीय कौशल्याने अपक्ष आणि वंचितच्या नगरसेवकांना आपल्या गोटात खेचण्यात यश मिळवले. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते सोनू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक विकास खरात आणि सुरेखा सोनावणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला.
अपक्ष व साई पक्ष निर्णायक
अपक्ष नगरसेविका सविता तोरणे-रगडे यांनी ओमी कलानी आणि शिवाजी रगडे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेला साथ दिली. तसेच साई पक्षाच्या दीप्ती दुधानी यांनीही आपली भूमिका स्पष्ट करत शिंदेसेनेसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शिंदेसेनेचा आकडा आता ४० वर पोहोचला आहे.
भाजपची 'वेट अँड वॉच' भूमिका
शिंदेसेनेने आकडा गाठल्याचा दावा केला असला तरी, भाजप अजूनही शर्यतीत कायम आहे. केवळ ३ नगरसेवक कमी असल्याने भाजप काँग्रेस आणि वंचितच्या नगरसेवकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. जर भाजपने शेवटच्या क्षणी काही नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले, तर उल्हासनगरचा महापौर कोणाचा होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
Web Summary : Ulhasnagar's mayoral race heats up. Shinde's Sena, backed by independents and VBA, claims majority. BJP still in the game, attempting to sway corporators. Outcome uncertain.
Web Summary : उल्हासनगर में महापौर पद की दौड़ तेज। निर्दलीय और वीबीए के समर्थन से शिंदे सेना ने बहुमत का दावा किया। भाजपा अभी भी मैदान में, पार्षदों को लुभाने की कोशिश। परिणाम अनिश्चित।