शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

पॉवर हाऊस? छे! हे तर अनेक अनैतिक धंद्यांचे केंद्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 06:56 IST

पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे, सत्ताधाºयांचा-लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर वचक नसल्याने कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरांचा अक्षरश: बट्याबोळ झाला आहे. आधीच अनेक प्रश्नांत अराजकाची स्थिती निर्माण झालेली असताना या शहरांची स्मार्ट सिटी करण्याचे आश्वासन दिले जात आहे.

- प्रशांत माने, डोंबिवलीपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे, सत्ताधाºयांचा-लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर वचक नसल्याने कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरांचा अक्षरश: बट्याबोळ झाला आहे. आधीच अनेक प्रश्नांत अराजकाची स्थिती निर्माण झालेली असताना या शहरांची स्मार्ट सिटी करण्याचे आश्वासन दिले जात आहे. पण ठाकुर्लीजवळील बावनचाळीचा परिसर पाहता, स्मार्ट सोडा पण आहे तेच आधी सुधारा असे म्हणण्याची वेळ आली आहे. इथेही विकास बेपत्ता झाल्याने एखाद्या भकास खेड्यात आलो की काय, असा भास होण्याइतकी येथील परिस्थिती भीषण आहे.ल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील; परंतु रेल्वेची हद्द म्हणून ओळखल्या जाणाºया ठाकुर्ली पश्चिमेकडील बावनचाळ परिसराला दोन दशकांपासून अवकळा आली आहे. एकीकडे रेल्वेची अनास्था आणि महापालिका प्रशासनाचे (ठरवून?) होत असलेले दुर्लक्ष यामुळे स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाºया कल्याण-डोंबिवलीतील हा भाग विकासापासून आजवर कोसो दूर राहिला आहे. वसाहतीतील बहुतांश घरांची पडझड झाली असून नागरी सुविधांचा उडालेला बोजवारा आणि सुरक्षेअभावी अनैतिकतेचा बिनदिक्कत होत असलेला व्यापार पाहता एकेकाळी वीज निर्मिती केंद्र असल्याने पॉवर हाऊस म्हणून नावाजलेला हा भाग आता ‘अनैतिक धंद्यांचे हाऊस’ म्हणून नावारूपाला आला आहे. हद्दीच्या वादात एखाद्या वसाहतीची कशी परवड होते, याची प्रचिती बावनचाळीचा परिसर पाहताना येते.१९२९ मध्ये याठिकाणी कोळशावर चालणारे औष्णिक वीज निर्मिती केंद्र रेल्वे प्रशासनाने सुरू केले. हे केंद्र उभे राहताना रेल्वेच्या अधिकाºयांसाठी ठाकुर्लीच्या पूर्वेकडील भागात अधिकाºयांसाठी जी घरे बांधण्यात आली. त्याला ‘बारा बंगला’ म्हणून संबोधले जाऊ लागले. त्याच्या बाजूलाच बांधलेल्या तीन-तीन अशा छोटया खोल्या या सर्व्हंट क्वाटर्स म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. कालांतराने ठाकुर्लीच्या पश्चिमेकडील भागात उभ्या राहिलेल्या सर्व वसाहतीला मिळून बावनचाळ असे नाव पडले.याठिकाणी रेल्वेचे वर्ग २ आणि ३ मधील अधिकारी, कर्मचारी राहायचे. त्यांच्यासाठी जी, एच टाईपसह निसन हट (गोलाकार लोखंडी तंबू) आदींची बांधकामे करण्यात आली. के आणि जे टाईप चाळींमध्ये चतुर्थश्रेणी कामगार वास्तव्य करू लागले. याठिकाणी खलाशांसाठी जागा दिल्या होत्या. एकंदरीत साधारण १५० खोल्यांचा समावेश असलेले बंगले, इमारती, चाळी उभारल्या गेल्या.बावनचाळीचा परिसर १७० एकराचा आहे. १९८७ मध्ये घडलेल्या एका अपघाताच्या घटनेने येथील जीवनमान पूर्णपणे बदलून गेले. वीजनिर्मिती केंद्रातील बॉयलर जीर्ण असल्याने त्याचा स्फोट झाला. यात सात कर्मचारी जागीच ठार झाले होते. याचा परिणाम म्हणजे येथील कामगार संघटनांनी कोळशावर वीज निर्मिती नको, ती गॅसवर करा अशी मागणी लावून धरली. कोळशामुळे बाहेर पडणाºया कणांमुळे प्रदूषणातही भर पडत होती. यातून काजळी निर्माण होऊन ती घराघरात जमत असे. त्यातच थेट चंद्रपूरहून कोळसा आणावा लागत असल्याने हे केंद्र तोट्यात गेले होते. अखेर, कोळशावर वीज निर्मिती नको ही वाढती मागणी पाहता ठाकुर्लीतील हे केंद्र बंद करून येथील कामगारांना इतरत्र नेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला. ज्या कामगारांना स्वेच्छानिवृती हवी किंवा स्वेच्छा बदली घ्यायची आहे ते घेऊ शकतात, अशी घोषणा करण्यात आली. काहींनी स्वेच्छानिवृत्ती घेतली तर मुलांचे भवितव्य मुंबईतच घडू शकते या कल्पनेने काहींनी बावनचाळीतच वास्तव्य करून माटुंगा, सीएसटी, कुर्ला येथील रेल्वेच्या प्राधिकरणांमध्ये नोकरी स्वीकारली. २००० साली हे वीजनिर्मिती केंद्र पूर्णपणे बंद करण्यात आले. ममता बॅनर्जी या रेल्वेमंत्री असताना त्यांनी येथे नैसर्गिक वायूवर आधारित ७०० मेगावॅटच्या वीजनिर्मिती केंद्र उभारण्याची घोषणा केली होती. परंतु ती आजतागायत कागदोपत्रीच राहिली. नंतरच्या काळात ही जागा चौपाटीसाठी, मनोरंजन केंद्रासाठी मागण्यात आली. पण रेल्वेने त्याला नकार दिला. त्यानंतर आता ही जागा टप्प्याटप्प्याने विकसित केली जात आहे. आता या केंद्राच्या काही भागात लोकलसाठी यार्ड उभारण्यात आले आहे. २० ते २५ लोकल उभ्या केल्या जातात. भविष्यात केंद्राच्या ठिकाणी एलेव्हेटेड रेल्वे टर्मिनस उभारण्याचे नियोजन आहे. ठाकुर्ली स्थानकाचा विस्तार, तेथील क्रॉसिंग बंद करून उभारला जाणारा पूल आणि रेल्वेच्या प्रकल्पामुळे पॉवर हाऊसचा परिसर वेगाने कात टाकतो आहे. पण बावनचाळींच्या परिसराकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत असल्याने त्या जागेवर बिल्डरांचा डोळा आहे.भूखंड विकण्याचा घाटमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात निवासी भाग वगळता मोकळा असलेला भूखंड विकण्याचा घाट घातला होता. त्यासाठी या भागाचे सर्वेक्षणही केले होते. मात्र ही प्रक्रिया बारगळली. कालांतराने याठिकाणी प्रस्तावित ठाकुर्ली टर्मिनस तर सोडाच वीज निर्मिती केंद्रही आजवर उभे राहू शकलेले नाही.सापत्न वागणूक : सद्यस्थितीला पडझड झालेली भग्नावस्थेतील घरे, रस्त्यांची दुरवस्था, आजूबाजूला वाढलेले रान, बंद पथदिवे या परिस्थितीमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक, गर्दुल्ले, प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे येथे सर्रास सुरू असतात. रेल्वेची हद्द असूनही ते करीत असलेले दुर्लक्ष आणि महापालिका क्षेत्रात येऊनही विकासकामांना मिळत नसलेला वाव पाहता या भागाला एकप्रकारे सापत्न वागणूक मिळत असल्याची भावना येथील रहिवाशांची झाली आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवली