शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो-४ प्रकल्पासाठी ठाण्यात वृक्षतोड करण्यास स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 05:33 IST

उच्च न्यायालय : एमएमआरडीएला उत्तर देण्याचे निर्देश

मुंबई : कासारवडवली-घाटकोपर-वडाळा या मेट्रो-४ प्रकल्पासाठी ठाण्यात वृक्षतोड करण्यासाठी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने दिलेल्या परवानगीला उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांची स्थगिती देत एमएमआरडीएला यासंदर्भात उत्तर देण्याचे निर्देश दिले.ठाणे नागरिक प्रतिष्ठान व रोहित जोशी यांनी उच्च न्यायालयात कासारवडवली-घाटकोपर-वडाळा या मेट्रो-४ उन्नत प्रकल्पाला सरकारने दिलेल्या मंजुरीला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मेट्रो-४ ही मेट्रो-३ प्रमाणे भुयारी करण्यात यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. प्रदीप नंद्राजोग व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे होती.

गुरुवारच्या सुनावणीत एमएमआरडीएच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, मेट्रो-४ साठी आतापर्यंत ठाण्यात २१ झाडे तोडण्यात आली आहेत. ही सर्व झाडे छोटी होती. मेट्रो-४ साठी तोडण्यात येणारी झाडे जंगली नसल्याने पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचणार नाही.दरम्यान, मुंबईतून मेट्रो-४ च्या मार्गिकेत येणाऱ्या झाडांची कत्तल करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून परवानगी घेतली नसल्याचे एमएमआरडीएने खंडपीठाला सांगितले.

याचिकाकर्त्यांनी एमएमआरडीएच्या म्हणण्यावर आक्षेप घेतला. ‘मेट्रोसाठी तोडण्यात येणारी झाडे ३० ते ४० वर्षे जुनी आहेत,’ असा दावा याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला.त्यावर न्यायालयाने एमएमआरडीएकडून तोडण्यात येणाºया झाडांचे फोटो मागितले. मात्र, एमएमआरडीए ते सादर करू न शकल्याने न्यायालयाने एमएमआरडीएला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. मात्र, तोपर्यंत या प्रकल्पासाठी एकही झाड न तोडण्याचे आदेश दिले.