शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना, भाजप नेत्यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजुर पोस्ट करणे पडले महागात; ठाणे पोलिसांनी सांगलीतून एकाला केली अटक

By अजित मांडके | Updated: June 10, 2023 16:26 IST

याबाबत ठाणे शिवसेना सचिव दत्तात्रय गवस यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

ठाणे : शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप नेत्यांच्या विरोधात सोशल मिडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकुर प्रसारीत करणाऱ्या युवा सेनेच्या (उबाठा) पदाधिकाऱ्याला सांगलीतून ठाणेपोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्याचे नाव प्रवीण पवार (३०) असे असून तो आदीत्य ठाकरे यांचा फोटा असलेल्या युवा सेना महाराष्ट्र या पेजवरुन केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या बाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत करीत होता. याबाबत ठाणे शिवसेना सचिव दत्तात्रय गवस यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.         युवासेना महाराष्ट्र राज्य या फेसबुक खात्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या विषयी आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र प्रसारित करण्यात आले होते. ठाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे ठाणे शहर सचिव दत्तात्रय गवस यांना हे मजकूर फेसबूकवर निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या मजकुरावरून आमच्या भावना दुखावल्या असल्याचे गवस यांनी पोलीस तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेची दखल घेत नौपाडा पोलिसांनी तपास केला असता हा मजकूर सांगली येथील कडेगाव मधील प्रवीण पवार याने प्रसारित केला असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी सांगली येथून प्रवीणला ताब्यात घेऊन अटक केली. प्रवीण हा ठाकरे गटाचा पादाधिकरी नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसShiv Senaशिवसेना