शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पोस्ट कोविड रिहॅबिलिटेशन सेंटर लवकरच उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 00:14 IST

विजय सूर्यवंशी : केडीएमसी, आयएमएचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : केडीएमसी, आयएमएची कल्याण व डोंबिवली शाखा यांच्या सहकार्याने पोस्ट कोविड रिहॅबिलिटेशन सेंटर लवकरच उभारण्यात येईल, अशी माहिती मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी सायंकाळी दिली. कोरोनाविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात कल्याण-डोंबिवलीतील टास्क फोर्सच्या डॉक्टरांसमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.कोविड पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त झाला, तरी कित्येक वेळा त्याच्या फुफफुसांमध्ये इन्फेक्शन राहते. त्यामुळे अशा रुग्णांना नंतरही बाहेरून आॅक्सिजन द्यावा लागतो. काळजी न घेतल्यास त्यांची प्रकृत्ती गंभीर होऊ शकते. अशा रुग्णांसाठी पोस्ट कोविड रिहॅबिलिटेशन सेंटर केडीएमसी उभारणार आहे. अशा कोरोनामुक्त रुग्णांना तेथे ठेवून त्यांच्यावर फिजिओथेरपी व अन्य उपचार केले जातील. त्यामुळे त्यांची प्रकृती लवकर सुधारू शकेल, असे यावेळी सांगण्यात आले.त्याचबरोबर या विषाणूच्या उपचारासाठी कोणती कार्यपद्धती अवलंबवावी, इन्फेक्शन कमी करण्यासाठी काय केले पाहिजे, या बाबींवर बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. त्यावर ताप हे केवळ कोरोनाचे लक्षण नाही.अशक्तपणा, जुलाब अशी अनेक लक्षणे कोरोनामध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांनी लवकरात लवकर चाचणी केली पाहिजे, असा मुद्दा डॉक्टरांनी मांडला. लक्षणे नसणाऱ्या रुग्णांनी (नातेवाईक, हायरिस्क पेशंट) कोरोनाची चाचणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे लवकर निदान होऊन उपचार करणे सुलभ होईल. तसेच चाचण्यांची वेळ वाढवल्यास अधिक लोकांना त्याचा लाभ घेता येईल, असा मुद्दा टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी मांडला. त्यावर मनपा चाचण्यांची वेळ सायंकाळी ४ ते ५ पर्यंत वाढविण्याचा विचार करीत असल्याची माहिती सूर्यवंशी यांनी दिली. एन.ए.बी.एल.ची मान्यता असलेल्या खाजगी लॅबने मनपाकडे विचारणा केल्यास त्यांनाही अ‍ॅण्टीजेन टेस्टसाठी परवानगी मिळवून देऊ, असेही आश्वासन त्यांनी दिले.दरम्यान, या बैठकीला टास्क फोर्स टीमच्या वतीने विक्रम जैन, डॉ. राजेंद्र केसरवानी, डॉ. अमित सिंग, डॉ. श्रेयस गोडबोले, डॉ. अर्चना पाटे, डॉ. प्रशांत पाटील आणि केडीएमसीच्या साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, डॉ. समीर सरवणकर, डॉ. विनोद दौंड यावेळी आदी उपस्थित होते.‘तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन करावे’टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी मनपाने उभारलेल्या कोविड केअर सेंटरमधील डॉक्टरांना मार्गदर्शन करावे, तसेच या केंद्रांना भेटी देऊन तेथील डॉक्टरांना सहकार्य करावे, अशी विनंती यावेळी केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी केली.