शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत तीन मजली इमारतीचा काही भाग चाळीवर कोसळला; एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 06:42 IST

ढिगाऱ्याखालून आठ जणांची सुटका; मदतकार्य सुरू

ठाणे: भिवंडीत तीन मजली इमारतीचा काही भाग चाळीवर कोसळला आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आठ जणांची सुटका केली आहे. आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्वप्रथम घटनास्थळी धाव घेतली. यानंतर एनडीआरएफचं एक पथकदेखील मदतकार्यात सहभागी झालं.

भिवंडीतील रसुला बाग भागातील तीन मजली इमारतीचा काही भाग शेजारच्या चाळीवर कोसळला. रात्री साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. इमारत शेजारच्या चाळीवर कोसळल्यानं काहीजण ढिगाऱ्याखाली अडकले होते. अग्निशमन दल, एनडीआरएफ, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं ढिगाऱ्याखालून आठ जणांची सुटका केली. मरीयम शेख (9 वर्षे), शफियाबी युसूफ (60 वर्षे), मुन्नाभाई चावला (45 वर्षे), मेहरुनिसा शेख (40 वर्षे) झरार अहमद शेख (45 वर्षे), उमर इस्माईल सय्यद (2 वर्षे), खातुनबी सय्यद (45 वर्षे) आणि आयुब सय्यद (63 वर्षे) अशी ढिगाऱ्याखालून सुटका केलेल्या व्यक्तींची नावं आहेत. 

 

टॅग्स :bhiwandiभिवंडीBuilding Collapseइमारत दुर्घटना