शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तणाव दूर करण्यासाठी करायचा अश्लील चाळे; ठाण्यातील विकृत पदवीधर बुलेटस्वाराचा प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 02:25 IST

घरातून सुटाबुटात बाहेर पडणारा आणि हेल्मेट घालून बुलेटवरून कामावर जाताना, तसेच परतताना शाळकरी, कॉलेज, नोकरदार तरुणींना अश्लील स्पर्श करणारा विकृत अखेर शुक्रवारी नवघर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

मुंबई : घरातून सुटाबुटात बाहेर पडणारा आणि हेल्मेट घालून बुलेटवरून कामावर जाताना, तसेच परतताना शाळकरी, कॉलेज, नोकरदार तरुणींना अश्लील स्पर्श करणारा विकृत अखेर शुक्रवारी नवघर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. वीरेन शहा (३८) असे त्याचे नाव असून, तणाव दूर करण्यासाठी तो हा प्रकार करत असल्याचे चौकशीतून समोर आले.ठाण्याचा चरईचा रहिवासी असलेला शहा विवाहित असून, त्याला १० वर्षांचा मुलगा आहे. घाटकोपरच्या एका नामांकित मॉलमध्ये तो काम करतो. सोसायटीतही विविध उपक्रमांमध्ये तो सहभाग घेत असे. सोसायटीत समाजसेवक म्हणून त्याने स्वत:ची ओळख तयार केली. तो घरातून सुटाबुटात बाहेर पडायचा. त्यानंतर, हेल्मेट घालून बुलेटवरून कामावर जायला निघायचा. कोपरीवरून म्हाडा, संभाजी मैदानमार्गे तो घाटकोपरला जात असे. गेल्या वर्षी फेब्रुवारीत कोपरी परिसरात एकट्या जात असलेल्या तरुणीच्या छातीला स्पर्श करत त्याने पळ काढला होता. डोक्यावर हेल्मेट असल्याने त्याची ओळख पटली नाही. या प्रकरणी कोपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.त्या पाठोपाठ मे महिन्यातही त्याने अशाच प्रकारे एका महिलेची छेड काढली. दुसरा गुन्हा दाखल झाल्याने शहाने म्हाडा कॉलनी, संभाजी मैदानाकडे मोर्चा वळविला. तेथे २ जानेवारी रोजी आजीसोबत निघालेल्या अल्पवयीन मुलीची त्याने छेड काढल्याने स्थानिकांमध्ये असंतोष वाढला. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पुढे, तक्रारीवरून शोध सुरू झाला. रहिवाशांनी त्याचे सीसीटीव्हीही पोलिसांना दिले. त्यानंतर, आणखी काही प्रकरणे उजेडात आली. मात्र, वैद्यकीय चाचणी नको, म्हणून ते तक्रारदार मागे फिरल्याचे तक्रारदार आजींकडून समजले. आता या प्रकरणातही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यापाठोपाठ गेल्या आठवड्यात तरुणीसोबत हा प्रकार घडल्यानंतर तिने न घाबरता पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार, गुन्हा दाखल करत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुष्कराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रताप भोसले, सपोनि माने, जाधव यांच्यासह अंमलदार राजेंद्र मोरे, कसार, खैरनार आणि घोडे यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेत, शुक्रवारी शहाला अटक केली.‘साहब स्टेÑस आता था..’‘साहब स्टेÑस आता था.. तब ऐसे करता था,’ असे त्याने पोलीस चौकशीत सांगितले. त्याने अनेक मुलींसोबत अश्लील चाळे केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार, त्याची कसून चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी