शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

पुण्याच्या प्रभा नेने ‘सौदामिनी’ पुरस्काराने सन्मानित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 06:12 IST

गेली १७ वर्षे पुण्यात वाहतूक नियंत्रण करण्यात मोलाचे योगदान देणा-या ८० वर्षीय प्रभा नेने यांना महिला महोत्सवात ‘सौदामिनी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ठाणे : गेली १७ वर्षे पुण्यात वाहतूक नियंत्रण करण्यात मोलाचे योगदान देणा-या ८० वर्षीय प्रभा नेने यांना महिला महोत्सवात ‘सौदामिनी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुरस्काराला उत्तर देताना नेने म्हणाल्या की, पुण्यात कचरा आणि वाहतूक या दोन समस्या आहेत. पुण्यात पोलीस बळ कमी आणि पुणेकरांना शिस्त कमी असल्याने मी वाहतुकीकडे वळले. त्यामुळे थोडेसे मार्गदर्शन करावे लागते आणि माझ्या या कामात सातत्य असल्याने त्याला महत्त्व आहे. जिथे कमी तिथे आम्ही, प्रयत्नांती परमेश्वर, बचेंगे तो और भी लढेंगे या तीन गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी नमूद केले.प्रारंभ कला अ‍ॅकॅडमी आयोजित महिला महोत्सवाचा दुसरा दिवस रविवारी गडकरी रंगायतन येथे रंगला. मंगला खाडिलकर यांच्या मनोमनी कार्यक्रमाने महोत्सवाची सुरुवात झाली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी व अभिनेत्री सुप्रिया पाठारे उपस्थित होत्या.हट्टंगडी म्हणाल्या की, उतारवयात जुन्या पिढीने पुढच्या पिढीकडे घराची जबाबदारी सशक्तपणे द्यावी. आपल्याप्रमाणेच त्या पिढीने घर सांभाळले पाहिजे, ही अपेक्षा न करता त्यांना त्यांच्याप्रमाणे करू द्यावे, म्हणजे आपल्याला चांगले जगता येईल. साठीनंतरचे वय हे अवघड असते. परंतु, या वयात समाजासाठी वेळ द्या आणि आनंदी-सुखी आयुष्य जगा, असा सल्ला त्यांनी दिला.पाठारे म्हणाल्या की, हा महिला महोत्सव म्हणजे एका महिलेने दुसºया महिलेसाठी केलेले मोठे काम आहे. प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभा थत्ते, मंजिरी चुणेकर, भटू सावंत, डॉ. मैत्रेय शाहा यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. मैत्रेय शाहा यांच्या वतीने त्यांचा पुरस्कार डॉ. ऊर्मिला कुमावत यांनी स्वीकारला.प्रारंभ कट्टा अर्थात ‘गप्पा मनातल्या मनमोकळ्या’ याअंतर्गत अभिनेते अजय पुरकर आणि ३५वर्षे एकत्र कुटुंबात राहणाºया घरकुलाच्या प्रतिनिधी सुचिता सावंत यांची मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत अ‍ॅकॅडमीच्या संचालिका डॉ. अरुंधती भालेराव यांनी घेतली. त्यानंतर, कॉमेडीची बुलेट ट्रेन-फेम संदीप गायकवाड याचा कॉमेडीशो झाला. त्याने रसिकांना पोटधरून हसवले. डॉ. मेधा मेहेंदळेयांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. पंकज पाडाळे दिग्दर्शित नृत्याविष्काराचा आस्वाद रसिकांनी घेतला. कार्यक्रमाला पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, सर्वांगीचे सर्वेसर्वा कृष्णा भानगे उपस्थित होते.