शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली स्थानकातील पूल जूनपर्यंत पाडणार, कल्याण दिशेकडील पूल कमकुवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 03:34 IST

सर्वाधिक गर्दीचे अशी ख्याती असलेल्या डोंबिवली रेल्वेस्थानकातील कल्याण दिशेकडील १९८० च्या सुमारास बांधलेला पादचारी पूल कमकुवत झाला आहे.

डोंबिवली - सर्वाधिक गर्दीचे अशी ख्याती असलेल्या डोंबिवली रेल्वेस्थानकातील कल्याण दिशेकडील १९८० च्या सुमारास बांधलेला पादचारी पूल कमकुवत झाला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हा पूल लवकरात लवकर पाडून नवीन बांधण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. मात्र, हा पूल जून अखेरपर्यंत पाडण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी दिली. दरम्यान, प्रवाशांनी मधल्या प्रशस्त रुंद पुलाचा वापर करावा, असे आवाहनही रेल्वेने केले आहे.डोंबिवली स्थानकातील कल्याण दिशेकडील पुलाचा वापर रेल्वे प्रवाशांबरोबरच पूर्व-पश्चिमेला ये-जा करणारे नागरिकही करत आहेत. मात्र, या पुलाची रुंदी अवघी ४.८ मीटर असल्याने तो अपुरा ठरत आहे. एका वेळी अनेक फलाटांवर लोकल आल्यास या पुलावर प्रवाशांची गर्दी होते. त्यामुळे तेथे चेंगराचेंगरी होण्याची भीती आहे.एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील पादचारी पूल दूर्घटनेनंतर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या पुलाची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी प्रवाशांसमवेत चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी या पुलावरून प्रवाशांना ये-जा करायला लावू नका, असे आदेश स्थानक प्रबंधकांना दिले होते. त्यानंतर अवघे १५ दिवस रेल्वे प्रशासनाने उद्घोषणा करून प्रवाशांना आवाहन केले. मात्र, त्यानंतर उद्घोषणा बंद झाल्याने पुन्हा स्थिती जैसे थे झाली आहे. अलिकडच्या मुंबईतील पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हा कमकुवत पूल पाडावा, अशी मागणी डोंबिवलीतील प्रवाशांकडून जोर धरत आहेत.त्या पार्श्वभूमीवर जैन म्हणाले, जून अखेरपर्यंत हा पूल पाडण्यात येणार आहे. त्यावर यंत्रणेचा असणार आहे. मात्र, नवीन पूल कधीपर्यंत बांधणार, असे विचारले असता त्यांनी आता त्याचे कोणतेही नियोजन नाही. पुढील काही दिवसांत त्यासंदर्भात भाष्य करणे उचित ठरेल, असे स्पष्ट केले. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने हा पूल तोडण्याचा निर्णय घेतला आहे, तो स्वागतार्ह आहे. मात्र, हा पूल लवकरात लवकर पाडावा. जूनपर्यंत वाट बघू नये, अशी अपेक्षा उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेने व्यक्त केली आहे.नवीन पूल सहा मीटर रुंदीचाकल्याण दिशेकडील नवीन पूल सहा मीटर रुंदीचा असणार आहे. स्कायवॉकची रुंदीही तेवढी असल्याने तो योग्य पद्धतीने सांधला जाईल. त्यामुळे पुलावर गर्दीच्या वेळेत चेंगराचेंगरी होणार नाही. जास्तीच जास्त नागरिक ये-जा करून शकतील.‘ते’ पूल लवकरच पाडणारमध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी मंगळवारी कळवले की, मध्य रेल्वेवरील कुर्ला, भांडूप, विक्र ोळी, दिवा, कल्याण स्थानकातील पादचारी पूल आठवड्यानंतर विशिष्ट अंतराने पाडण्यात येणार आहेत. या पुलांच्या वयोमानानुसार ते कसे व कधी पाडायचे, याचे नियोजन करणे सुरू आहे. त्यानुसार लवकरच माहिती कळवली जाईल. या कामाच्या निविदा निघाल्या आहेत.

टॅग्स :thaneठाणेdombivaliडोंबिवली