शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे प्रदूषण थांबले, आता प्रदूषणकारी कंपन्या डोंबिवली एमआयडीसीत नकोच, मनसेची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 11:29 IST

प्रदुषण करणाऱ्या सर्व कंपन्या बंदच ठेवा, कोरोना हा श्वसनाशी संबंधित आजार आहे, डोंबिवलीत वारंवार प्रदुषणाच्या त्रासाने डोंबिवलीकरांना श्वसना संबंधी आजार होतंच असतात हे सिध्द झाले आहे, कोरोनाच्या ह्या संकटात अश्या प्रदुषण करणाऱ्या कंपन्यांना जर लाॅक डाऊन कालावधीत परवानगी दिली तर ह्या कंपन्या प्रदुषण करणार ह्यात तीळ मात्र शंका नाही

डोंबिवली : डोंबिवली औद्योगिक क्षेत्रात असलेल्या प्रदूषणकारी कंपन्यांनी मोठा हाहाकार परिसरात माजवला होता.मात्र लॉकडाऊन मध्ये कंपन्या बंद असल्याने प्रदूषण थांबले,होणारे स्फोट थांबले. डोंबिवली मध्ये हिरवा पाऊस तर कधी ऑइल मिश्रीत पाऊस , गुलाबी रस्ता अश्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे डोंबिवलीकरांच्या जीवावर उठलेल्या कंपन्यांना परवानगी देऊच नका अशी मागणी मनसेचे राज्य उपाध्यक्ष, डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांकडे ट्विटद्वारे केली आहे. कदम यांनी पत्रात आणि ट्विट द्वारे सांगितले की  प्रदुषण करणाऱ्या सर्व कंपन्या बंदच ठेवा, कोरोना हा श्वसनाशी संबंधित आजार आहे, डोंबिवलीत वारंवार प्रदुषणाच्या त्रासाने डोंबिवलीकरांना श्वसना संबंधी आजार होतंच असतात हे सिध्द झाले आहे, कोरोनाच्या ह्या संकटात अश्या प्रदुषण करणाऱ्या कंपन्यांना जर लाॅक डाऊन कालावधीत परवानगी दिली तर ह्या  कंपन्या प्रदुषण करणार ह्यात तीळ मात्र शंका नाही, आपण नुकतीच डोंबिवली एमआयडीसी परिसराला भेट दिलेली होतीच, व त्या नुसार आपण प्रामाणिकपणे व्यवसाय करा किंवा टाळे लावा असा आदेश देवून चौकशी समिती बसवलेली होतीच त्याचा अहवालही आपणाकडे असुन त्यानुसार बऱ्याच कंपन्यांना दंड आकारलेला आहे, अश्या कंपन्यांना ह्या लाॅक डाउन कालावधीत परवानगी देवूच नये ही अपेक्षा आहे, सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे, डोंबिवली रेड झोन मधे असल्याने नागरीक भयभीत आहेत, प्रदुषणावर जर श्वसनाचा त्रास झाला तर खाजगी रूग्णालये पण डोंबिवलीकरांना कोविड रूग्णालयात पाठवतील व डोंबिवलीकरांसाठी हा चिंतेचा विषय होईल.मेट्रोपॉलीटिन एक्सिम या रासायनिक कंपनीला लागलेल्या आगी संदर्भात कदम म्हणाले की, त्या रासायनिक कंपनीला फेब्रुवारी महिन्यात मोठी आग लागली होती. आगीने काही काळातच भीषण रूप धारण केले . रसायन भरलेल्या ड्रम आग लागून त्यांचे एकामागोमाग एक असे 70 स्फोट होत राहिले व धुराचे लोळ आकाशात उडत होते. मात्र आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून आग लावली की लागली हा प्रश्न कायम आहे. विशेष म्हणजे तर दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली याची माहिती सुद्धा देण्यात आली नाही असेही कदम म्हणाले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMIDCएमआयडीसीpollutionप्रदूषण