शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये प्रदूषणकारी प्लान्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 02:30 IST

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

- धीरज परबमीरा रोड : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ तसेच इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये सर्रास प्रदूषणकारी अनेक आरएमसी प्लान्ट सुरू असल्याने वन्यजीव, पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. परंतु, वनविभागासह महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या आरएमसी प्लान्टवर कारवाई करण्याऐवजी पाठीशी घालण्याची भूमिका घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.चेणेगाव हे पूर्णपणे इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये येते. तसे असताना येथे सर्रास दोन आरएमसी प्लान्ट चेणे नदीकिनारी सुरू आहे. वरसावेही इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये मोडत असताना येथेही प्लान्ट चालवला जातो. घोडबंदर गावाजवळ तर एका ओळीने प्रदूषणकारी आरएमसी प्लान्ट सुरू आहेत. महापालिकेच्या प्रभाग १३ व १४ मध्ये सुरू असलेल्या या ८ ते १० आरएमसी प्लान्टमुळे मोठ्या प्रमाणात सिमेंट, रासायनिक पावडर, खडी आदींचे कण हवेत मिसळतात. रस्त्यापासून घरांमधील भांड्यांवर सतत या कणांचा थर साचत असतो. श्वास घेण्यासही अनेकांना त्रास होतो. श्वसनाबरोबरच खाण्यातूनही कण शरीरात जातात.मानवी आरोग्याला घातक अशा सततच्या या कणांमुळे नागरिकांमध्ये दमा, खोकला आदी विकार बळावू लागले आहेत. रस्त्यांवर तर वाहनांच्या येजामुळे हवेत पांढरा थर दिसून येतो. नवजात बालक, लहान मुले, वृद्ध, रुग्ण तसेच महिलांना तर खूपच त्रास होत असतो.या प्लान्टमुळे मानवी आरोग्यासह वन्यजीव व पर्यावरणालाही धोका निर्माण झाल्याचा आरोप होत आहे. बक्कळ कमाई असलेल्या प्रदूषणकारी आरएमसी प्लान्टची काटेकोर तपासणी केली जात नाही. कारवाईची जबाबदारी ही वनविभागासह जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाची असताना त्यांच्याकडून या प्लान्टना पाठीशी घातले जाते. या भागातील ८ ते १० प्लान्टना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यानंतर, आणखी दोन नोटिसा बजावल्या जाणार आहेत. सनियंत्रण समितीने प्रस्ताव फेटाळले, तर नाहरकत न देता प्लान्टवर कारवाई करता येईल, असे सूत्रांनी सांगितले.वनविभागाकडून नाहरकत आल्यानंतर मंडळाकडून परवानगी दिली जाते. चेणे येथील दोन प्लान्टची पाहणी केली असता वनविभागाची नाहरकत त्यांनी दाखवली. पण, आवश्यक बाबींची पूर्तता नसल्याने त्यांना कळवले आहे. घोडबंदर येथील एका प्लान्टला नोटीस बजावली आहे. निवडणुकीनंतर पाहणी करून आवश्यक कार्यवाही केली जाईल. - सुवर्णा गायकवाड, विभागीय अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळइकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये आरएमसी प्लान्ट हे हरित क्षेत्रात मोडत असल्याने चालवता येतात. त्यांना परवानगी द्यायची की नाही, याबाबतचा निर्णय प्रदूषण नियंत्रण मंडळाने घ्यायचा आहे.- दिनेश सिंग, सहायक वनसंरक्षकनियमांचे उल्लंघन करून चालणाऱ्या प्रदूषणकारी बेकायदा आरएमसी प्लान्टमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाळीव जनावरे, वन्यजीव तसेच पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. परंतु, यंत्रणा कारवाईस टाळाटाळ करत आहेत. हे सर्व प्लान्ट बंद करून पाडून टाकावेत व त्यांच्या चालकांवर गुन्हा दाखल करावा. बेजबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करावे. - निलेश फापाळे, तक्रारदार

टॅग्स :pollutionप्रदूषण