शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिलांची मतदान केंद्रे गुलाबी, युवकांची पिवळी, दिव्यांगांची निळी; पडदे, कार्पेट, सेल्फी बुथ व कर्मचाऱ्यांचा पोशाख एकाच रंगाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 12:48 IST

मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.

ठाणे : पडदे, कार्पेट, फुगे, झालर, रांगोळी, सेल्फी बुथ यांच्या साहाय्याने व एकसारख्या रंगांच्या कपड्यांनी महिला, युवा व दिव्यांग मतदान केंद्रे सजणार आहेत.गुलाबी रंगाने महिला, पिवळ्या रंगाने युवा, तर आकाशी निळ्या रंगाने दिव्यांग मतदान केंद्रे तयार केली आहेत. मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.  ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे १८ केंद्रांवर महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या केंद्रासाठी गुलाबी रंग ठरविण्यात आला. महिला मतदान केंद्रामध्ये पडदे, कार्पेट, फुगे, झालर, रांगोळी, सेल्फी बुथ, मतदान केंद्राचे प्रवेशद्वार, तसेच मतदान केंद्रामध्ये नियुक्त सर्व महिला कर्मचारी यांनी गुलाबी रंगाची वस्त्रे परिधान केलेली असतील. मतदान केंद्रामधील मंडपामध्ये भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळविलेल्या महिलांचे फोटो लावण्यात येणार आहेत. 

युवा मतदान केंद्रांवर युवा कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. या केंद्रासाठी पिवळा रंग ठरविण्यात आला आहे. मतदान केंद्रामधील मंडपामध्ये युवा यशस्वी उद्योजक, खेळाडू, शास्त्रज्ञ, यांचे फोटो लावण्यात येतील.

कर्मचारी कोळी वेशभूषेतभिवंडी ग्रामीण मतदारसंघामधील सारंग गावातील मतदान केंद्र क्र. ३२१ मध्ये ठाणे जिल्ह्यातील आगरी-कोळी संस्कृतीचे दर्शन घडवण्यात येणार आहे. यासाठी मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणारी जाळी, मासे विक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या टोपल्या, बोट, रांगोळी यांचा वापर केला जाणार आहे. मतदान केंद्रावरील कर्मचारी हे कोळी वेशभूषेत असतील.

दिव्यांगासाठीही केंद्रठाणे जिल्ह्यातील १७ विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे १७ केंद्रांवर दिव्यांग कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या केंद्रासाठी आकाशी निळा रंग ठरविण्यात आला आहे. मतदान केंद्रामध्ये पडदे, कार्पेट, फुगे, झालर, रांगोळी, सेल्फी बुथ, प्रवेशद्वार, तसेच नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांनी आकाशी रंगाचे कपडे परिधान केलेले असतील. 

मतदान केंद्राच्या मंडपामध्ये भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळविलेल्या दिव्यांग यशस्वी उद्योजक, खेळाडू, शास्त्र, अभिनेता, लेखक यांचे फोटो लावण्यात येणार आहेत. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४thaneठाणेVotingमतदान