शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण जिल्हा परिषदेच्या सहा जागा व पंचायत समितीच्या 12 जागांसाठी शांततेत मतदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 18:28 IST

कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा जागा व पंचायत समितीच्या 12 जागांसाठी आज मतदान घेण्यात आले. मतदानासाठी विविध मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदारांनी रांगा लावल्या होत्या.

कल्याण- कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा जागा व पंचायत समितीच्या 12 जागांसाठी आज मतदान घेण्यात आले. मतदानासाठी विविध मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदारांनी रांगा लावल्या होत्या. कल्याण तालुक्यात दुपारपर्यंत 55 टक्के मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी पाहता सगळ्याच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले.वरप गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका मतदान केंद्रावर 1 हजार 27 मतदारांचे मतदान होते. दुपारी 1 वाजता या मतदान केंद्रावर 40 मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला होता. कांबा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील तीन मतदान केंद्रावर दुपारी दीड वाजेर्पयत 61 ते 70 टक्के मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी संपूर्ण तालुक्यात दुपारी एक वाजता 48 टक्के असताना कांबा गावातील मतदानाची टक्केवारी पाहता कांबा गावातील मतदारांनी मतदानात आघाडी घेतली असल्याचे दिसून आले.कल्याण तालुक्यातील चार गण सोडता अन्य ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादीची युती असली तरी कांबा गटातून निवडणूक लढविणारे शिवसेनेचे उमेदवार संदीप पावशे यांनी सांगितले की, केवळ कांबा गटातच शिवसेना-भाजपाची युती आहे. जास्तीचे मतदान हे आम्हाला फायदेशीर ठरू शकते, असा दावा पावशे यांनी केला. म्हारळ गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मतदान केंद्रात मतदारांनी मतदानासाठी एकच गर्दी केली होती. म्हारळ गावातील मतदान प्रक्रिया कशा प्रकारे सुरू आहे, याची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह युवा सेनेचे जिल्हाधिकारी दीपेश म्हात्रे, उल्हासनगरचे शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी भेट दिली.प्रत्यक्ष पाहणी पश्चात खासदार शिंदे यांनी सांगितले की, मतदानाची आकडेवारी पाहता शिवसेना राष्ट्रवादीला चांगल्या जागा मिळतील. जिल्हा परिषदेवर शिवसेनाचा भगवा झेंडा फडकेल, असा दावा खासदार शिंदे यांनी यावेळी केला.नेवाळी आंदोलनामुळे खोणीत तणावपूर्ण शांततेत मतदाननेवाळी विमानतळासाठी ब्रिटिश काळात शेतक-यांच्या जमिनी घेतल्या होत्या. त्या परत मिळाव्यात यासाठी नेवाळी परिसरातील शेतक-यांनी जून 2017 मध्ये आंदोलन केले होते. या आंदोलनापश्चात खोणी व पिंपरी परिसरात निवडणूक होत असल्याने खोणी परिसरात तणावपूर्ण शांतते मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. 2002 साली नवी मुंबई महापालिकेतून वगळण्यात आलेली 14 गावे ही कल्याण तालुक्यातील तहसील व कल्याण पंचायत समितीला जोडल्याने या गावांनी खोणी गट व पिंपरी गणासाठी मतदान केले.

मांजर्लीत बदलापूर मांजर्ली गावातील मांजर्ली गटाच्या मतदार यादीत बदलापूर मांजर्ली गावातील 80 मतदारांची नावे मिळून आली. मतदान प्रतिनिधींनी या नावांना आक्षेप घेतला. मात्र हा आक्षेप मतदान अधिका-यांनी धुडकावून लावला. 

टॅग्स :kalyanकल्याण