शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गाेळीबाराच्या घटनेवरून राजकारण पेटले; सुप्रिया सुळे अमित शाह यांना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 09:03 IST

आमच्यासारखे लोक या कारणामुळे तुरुंंगात जाऊन आले.  

भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबारानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीही याबाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. विरोधकांकडून गृहमंत्री फडणवीस यांचा राजीनामा मागण्यात येत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागितला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार असल्याचं म्हटलं आहे. 

झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे.         - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

वरिष्ठ स्तरावर चौकशीचे आदेश कायद्यासमोर सगळे समान आहेत. कोण कुठल्या पक्षाचा आहे, हे विचार न करता कायदेशीर कारवाई केली जाईल. गोळीबाराची ही घटना पोलिस स्टेशनमध्ये का घडली? गोळीबार झाला याचे सत्य शोधावे लागेल. या संदर्भात वरिष्ठ स्तरावर चौकशीचे आदेश डीजींना दिले आहेत. या संदर्भात अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल.      - देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री, गृहमंत्री.

गायकवाड यांच्या बोलण्यात वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या उल्हासनगरमधील घटना सर्वांनी पाहिली असून, आमदार गायकवाड हे वैतागलेल्या माणसासारखे बोलत होते. मात्र, संविधानाने दिलेल्या अधिकारांचा दुरुपयोग होणार नाही, याची खबरदारी लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे. गायकवाड यांच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या. रात्री उशिरा त्याबाबत आपल्याला माहिती मिळाली. वास्तविक कुणीही अशा पद्धतीने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. घटनेबद्दल मी माहिती घेणार असून, याबाबत आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार आहे.     - अजित पवार, उपमुख्यमंत्री.

मुख्यमंत्री शिंदे यांचा राजीनामा घ्यामुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात पोलिस ठाण्यात अंदाधुंद गोळीबार होतो, हे लांच्छनास्पद आहे, पंतप्रधानांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेतला पाहिजे. सत्ताधारी भाजपचा आमदार सत्ताधारी शिंदे गटाच्या शहराध्यक्षावर गोळीबार करतो, याचा अर्थ महाराष्ट्रात महायुतीमध्ये गँगवार सुरू आहे. आ. गायकवाड यांनी त्यांचे काेट्यवधी रुपये एकनाथ शिंदे यांच्याकडे पडले आहेत, असे विधान केले. किती कोटी रुपये पडले त्याचा आकडा त्यांनी सांगितला नाही. तो आकडा १००, १५० किंवा २०० काेटी आहे का? हे कोट्यवधी रुपये शिंदे यांच्याकडे असतील, तर त्याला मनी लाँड्रिंग म्हणतात. आमच्यासारखे लोक या कारणामुळे तुरुंंगात जाऊन आले.      - खा. संजय राऊत, शिवसेना ठाकरे गट 

गृहमंत्री अमित शाह यांना भेटणारराज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा आणि या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. सुसंस्कृत राज्यात गँगवॉर चालले असेल आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलिस ठाण्यात गोळीबार करत असतील, तर त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी, मी हा प्रश्न सोमवारी संसदेत उपस्थित करेन. गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेणार आहे.     - सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस.

टॅग्स :FiringगोळीबारthaneठाणेSupriya Suleसुप्रिया सुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस