शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय अनास्था गावठाणांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 03:28 IST

निवेदने देऊनही कार्यवाही नाही : उच्च न्यायालयात दाद मागण्याचा ग्रामस्थाचा पवित्रा

कल्याण : ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांचे झपाट्याने नागरीकरण झाले, परंतु राजकीय अनास्थेमुळे येथील गावठाणांच्या विस्ताराकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत एमएमआरडीए हद्दीतील ग्रामीण भागातील भूमिपुत्रांनी वेळोवेळी लक्ष वेधले आहे. अंबरनाथ तालुक्यातील ब्राम्हण करवले येथील रहिवासी रामदास म्हात्रे हे चार वर्षांपासून यांसदर्भात पाठपुरावा करत आहेत. याप्रकरणी त्यांनी ३२ आमदारांना निवेदने दिली आहेत. गावठाणांच्या विस्ताराबाबत येत्या हिवाळी अधिवेशनापर्यंत निर्णय न झाल्यास नाईलाजास्तव उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागेल, असा पवित्रा म्हात्रे यांनी घेतला आहे.

ब्रिटिशकाळापासून गावठाणे अस्तित्वात आहेत. मुंबईतील सरकारी जमिनी राज्य सरकारने विविध योजनांसाठी आरक्षित ठेवल्या आहेत. मात्र त्या जागेवर परप्रांतियांनी अतिक्रमण करून झोपडपट्ट्या उभारल्या आहेत. ही अतिक्रमणे हटविण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन आणि बीएसयूपी योजना राबवण्यात आल्या. परंतु, मूळ गावठाणे आणि तेथील मूळ निवासी जैसे थे राहिल्याने त्या वस्त्यांना बकालतेचे स्वरूप आले आणि त्या योजनांचा लाभ इतरांना मिळाला. गावठाणांचे अस्तित्व अंदाजे पावणे दोनशे वर्षांपासून आहे. दर १५ वर्षांनी त्याचा विस्तार करणे हे क्रमप्राप्त आहे. भूमिपुत्रांच्या मागणीनुसार हा विस्तार केला जातो. मात्र, याबाबतची ग्रामस्थांना विस्तृत माहिती नसल्याने तसेच राजकीय मतभेदांमध्ये गावठाणांच्या विस्ताराला मुहूर्त मिळालेला नाही.

ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रात अतिक्रमणांमुळे विस्तार होणे सध्या शक्य नाही, परंतु एमएमआरडीएच्या हद्दीत असलेल्या सर्व ग्रामपंचायत क्षेत्रातील उपलब्ध असलेल्या सरकारी जमिनींवर लोकसंख्येच्या निकषानुसार या जमिनी गावठाणांचे नियोजन करून दरडोई सरकारी नियमानुसार २०० ते ६०० चौरस मीटर जमीन द्यावी, त्याचबरोबर शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, खेळाची मैदाने, समाज मंदिर, यासाठी भूखंड राखीव ठेवावेत, अशीही मागणी सातत्याने होत आहे. झोपडपट्टी विरहित शहरांसाठी सरकारच्या अनेक योजना आल्या, पण खरोखरच शहरातून झोपड्या हटल्या का?, असा सवाल म्हात्रे यांचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावठाण विषयासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे, परंतु राजकीय अनास्था असल्याने ठोस कार्यवाही होऊ शकलेली नाही. परिणामी मूळ निवासी वंचितच राहिला असल्याचे म्हात्रे यांचे म्हणणे आहे.एमएमआरडीएनेच घ्यावा पुढाकारच्एमएमआरडीएच्या हद्दीत गायरान आणि पडीक जमिनी येत असल्याने व त्यांच्याकडे यंत्रणा उपलब्ध असल्याकारणाने त्यांनीच विस्तारासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे, त्यासाठी राजकीय पुढाऱ्यांनी याची दखल घेणे गरजेचे आहे.च्मात्र, तसे होत नसल्याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे. दरम्यान, यासंदर्भात उल्हासनगर प्रांत अधिकारी जगतसिंग जिराशे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाMuncipal Corporationनगर पालिका