शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

दहीहांडी उत्सवावर पोलीसांचा वॉच; ३ हजाराहून अधिक पोलीस बंदोबस्तावर

By अजित मांडके | Updated: September 6, 2023 15:45 IST

ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आदीसह इतर ठिकाणी गुरुवारी दहीहांडीची धुम असणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यासह जिल्ह्यच्या विविध भागात दहीहांडी धुम होणार असल्याने यावेळी कोणताही अनुचीत प्रकार घडू नये या उद्देशाने ठाणे पोलीस सर्तक झाले आहे. त्या अनुषंगाने मानाच्या हंडीसह इतर हंडीच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. यासाठी ३ हजाराहून अधिक पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. तसेच ४ एसआरपीएफच्या कंपनी आणि ४०० होमगार्डही त्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत.

ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आदीसह इतर ठिकाणी गुरुवारी दहीहांडीची धुम असणार आहे. मागील काही वर्षात या उत्सवाला वेगळे स्वरुप प्राप्त झाल्याने त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले असते. प्रत्येक मानाच्या हंडीच्या ठिकाणी थरावर थर लावले जात असतात.

त्यामुळे या हंडी फोडण्यासाठी ठाण्यासह जिल्ह्यातून आणि मुंबई व इतर परिसरातून शेकडो गोंविदा पथके ठाण्यात येत असतात. तसेच या हंडी पाहण्यासाठी ठाणेकर नागरीक देखील रस्त्यावर उतरत असतात. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुक कोंडीही होत असते. त्यामुळे वाहतुक कोंडी सोडविण्याबरोबरच या उत्सवाला गालबोट लागू नये, छेडछाडीचे प्रकार या निमित्ताने होऊ नयेत, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाने ठाणे पोलीस सज्ज झाले आहेत. पोलीस आयुक्तालयात परिमंडळ निहाय पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

त्यानुसार यात ५ अप्पर पोलीस आयुक्त, १० पोलीस उप आयुक्त, १५ सह पोलीस आयुक्त, ९६ पोलीस निरिक्षक, २८८ सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पोलीस उपनिरिक्षक २८८, पोलीस अंमलदार २३३२, अंमलदार ५३६ आणि एसआरपीएफच्या ४ कंपन्यासह ४०० होमगार्ड आदींचा यात समावेश आहे. एकूण बंदोबस्ताबरोबर त्यात अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. तसेच मुंबई कडून २ एसआरपीएफच्या तुकड्या मागविण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Dahi HandiदहीहंडीPoliceपोलिस