शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
4
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
5
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
6
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
7
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
8
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
9
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
10
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
11
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
12
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
13
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
14
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
15
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
16
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
17
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
18
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
19
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
20
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा

१ हजार १११ प्रकरणात कौटुंबिक समझोता घडवून आणण्यात पोलिसांच्या भरोसा सेलला यश

By धीरज परब | Updated: October 8, 2023 14:18 IST

भरोसा सेलचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा 

मीरारोड - मीरा भाईंदर मधील पोलिसांच्या भरोसा सेल ने गेली दोन वर्षात १ हजार १११ कौटुंबिक व अन्य प्रकरणात यशस्वी समझोता घडवून आणण्यात यश मिळवले आहे . विशेषतः पती - पत्नी तसेच कुटुंबातील वाद दूर करून त्यांचे संसार फुलवणाऱ्या भरोसा सेलचा दुसरा वर्षापन दिवस सुद्धा मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला गेला. 

ठाणे ग्रामीण पोलीस असतात तत्कालीन सहायक अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पुढाकार घेऊन भाईंदर पोलीस ठाण्याच्या गच्चीवर भरोसा सेल कार्यान्वित केला होता . अल्पवधीतच भरोसा सेलने लोकांचा भरोसा जिंकला . कुलकर्णी यांच्या बदली नंतर मात्र भरोसा सेल काहीसा दुर्लक्षित झाला. 

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय अस्तित्वात आल्या नंतर तत्कालीन पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी आयुक्तालयाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून १ ऑक्टोबर २०२१ रोजी भरोसा सेल पुन्हा सुरु केला . त्याची धुरा दाते यांनी महिला सहायक निरीक्षक तेजश्री शिंदे यांच्या हाती दिली . शिंदे यांनी देखील दिलेली जबाबदारी सार्थ ठरवत अनेकांचे संसार जोडण्याचे कार्य चालवले आहे. 

महिला, बालके व जेष्ठ नागरिक यांच्या समस्या एकाच छताखाली सोडवण्याचे काम भरोसा सेल करत आहे . गेल्या २ वर्षात भरोसा सेल मध्ये एकुण १८४१ तक्रारी अर्ज प्रकरणे आली . त्यापैकी १ हजार १११ प्रकरणांचे निराकरण करून अनेक कुटुंबात समझोता घडवुन आणण्यात आला आहे. समझोत्याचे प्रमाण हे जवळपास ६१ टक्के इतके असून ते आणखी वाढवण्यासाठी भरोसा सेल प्रयत्नशील आहे . या शिवाय परदेशात कौटुंबिक हिंसाचारास बळी पडलेल्या पिडीत महिलेस, कामानिमित्त परदेशात जाऊन अडकलेल्या ४ जणांना भारतीय दुतावासाच्या मदतीने सुखरुप भारतात आणण्यात भरोसा सेल ला यश मिळाले आहे. 

भरोसा सेलच्या वर्धापन दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात गुन्हे शाखेच पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त अमोल मांडवे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, भरोसा सेलच्या प्रभारी सहायक निरीक्षक तेजश्री शिंदे सह पोलीस ठाण्यातील बालकल्याण अधिकारी, महिला दक्षता समिती सदस्य, भरोसा सेलचे अधिकारी व कर्मचारी ,  भरोसा सेल मधून पुन्हा जुळलेली कुटुंब तसेच भरोसा सेल मध्ये विनामूल्य सेवा देणारे समुपदेशक आदी उपस्थित होते. यावेळी केक कापून व उपस्थितांना मार्गदर्शन करून तर काहींनी स्वतःचे अनुभव कथन करून भरोसा सेलचा वर्धापन दिन आनंदात व उत्साहात साजरा केला . यावेळी उपायुक्त अंबुरे यांच्या हस्ते भरोसा सेल मध्ये येणाऱ्यांचे समुपदेशन करणारे वकील, डॉक्टर, समाजसेवक, एनजीओ सदस्य आदींचे सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव केला. भरोसा सेलच्या कार्याचे यावेळी अंबुरे यांनी कौतुक केले.