शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पोलिसांना कोरोनावरील लसीकरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 21:55 IST

कोणतीही भीती न बाळगता कोरोनावरील लस घ्या. त्याबाबतच्या कोणत्याही अफवांना बळी पडू नका, असे आवाहन ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केले आहे.

ठळक मुद्दे पहिल्याच दिवशी पोलीस आयुक्तांसह ३० पोलिसांनी घेतली लसविवेक फणसळकर:भीती न बाळगता लस घेण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोणतीही भीती न बाळगता कोरोनावरील लस घ्या. त्याबाबतच्या कोणत्याही अफवांना बळी पडू नका, असे आवाहन ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केले आहे. ठाण्यात आरोग्य सेवेतील ६९ आणि ३० पोलीस अशा फ्रंटलाईनवरील ९९ कर्मचाऱ्यांना बुधवारी ही लस देण्यात आली.लसीकरणाच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस आयुक्त फणसळकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पोलिसांसहठाणेकरांना हा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. ठाण्यात पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह ठाणे महापालिकेतील कर्मचाºयांना कोरोना लसीकरण बुधवारपासून सुरू करण्यात आले. ठाणे महापालिकेच्या कळवा आरोग्य केंद्रामध्ये पोलीस आयुक्त फणसळकर यांनी ही पहिली लस घेतली. त्यापाठोपाठ सह पोलीस आयुक्त सुरेश मेकला, अतिरिक्त आयुक्त प्रविण पवार, संजय येनपुरे, परिमंडळ एक ठाण्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, मुख्यालयाचे उपायुक्त गणेश गावडे, दत्ता कांबळे, विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, मुख्यालयाचे सहायक आयुक्त मंदार धर्माधिकारी आणि कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक-विजय दरेकर आदी ३० अधिकाºयांनी ही लस घेतली.यावेळी फणसळकर पुढे म्हणाले, ठाणे पोलीस दलाचा प्रमुख या नात्याने आपण ही लस घेतली आहे. कोरोना लसीचे कोणतेही दुष्परिणाम आरोग्यावर होत नाहीत. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी या लसीचा लाभ घ्यावा आणि चांगले आरोग्यमय जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आरोग्य कर्मचाºयांच्या कामाचेही त्यांनी यावेळी कौतुक केले. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ११ कोविड लस सेंटर उभारले आहेत. अत्यावश्यक सेवेत काम करणाºया कर्मचाºयांना फोन करून त्यांना विविध केंद्रावर लसीकरण केले जात आहे. त्यापैकी बुधवारी कळवा येथील आरोग्य केंद्रावर पोलिसांना लसीकरण सुरू केले आहे. लसीमुळे क्वचित प्रसंगी थोडाफार अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे घाबरून न जाता आपल्या दिलेल्या केंद्रावर जाऊन लसीकरण करावे, असे आवाहन ठाण्याच्या वैद्यकीय लस केंद्र अधिकारी डॉ. खुशबू टावरी यांनी केले. यावेळी डॉ. श्वेता भायगुडे आणि डॉ. हाला पाटील यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेCorona vaccineकोरोनाची लसPoliceपोलिस