शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काँग्रेस गटनेत्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 19:23 IST

​​​​​​​कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असताना नगरसेवक - राजकारणी मात्र मुजोरी करत नियमांचे उल्लंघन करत असल्याने नया नगर पोलिसांनी काँग्रेस गटनेत्यास दणका दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड -कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असताना नगरसेवक - राजकारणी मात्र मुजोरी करत नियमांचे उल्लंघन करत असल्याने नया नगर पोलिसांनी काँग्रेस गटनेत्यास दणका दिला आहे. सेल्फी पॉईंटच्या उदघाटनाच्या कार्यक्रमासाठी विना मास्क गर्दी जमळवल्या प्रकरणी मीरारोडच्या नया नगर पोलिसांनी काँग्रेस गटनेते जुबेर इनामदार सह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे . विशेष म्हणजे काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन सह अनेक नगरसेवक , पदाधिकारी व कार्यकर्ते विना मास्क गर्दी करून गोळा झाले होते . 

काँग्रेस गटनेते जुबेर इनामदार यांनी त्यांच्या नगरसेवक निधी मधून मीरारोडच्या नया नगर भागात स्टर्लिंग सभागृहच्या बाजूला रेल्वे समांतर रस्त्यालगतच्या नाल्यावर सेल्फी पॉईंटचे बांधकाम केले आहे . त्याच्या उदघाटनच्या कार्यक्रम करण्यासाठी इनामदार यांनी प्रभाग समिती कार्यालयातून परवानगी घेतली होती . परंतु स्थानिक पोलीस ठाण्याची परवानगी घेतली नव्हती . सदर सेल्फी पॉईन्टचे उदघाटन इनामदार यांनी काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांच्या हस्ते केले . यावेळी काँग्रेसचे अन्य नगरसेवक , पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने गर्दी करून जमले होते . विशेष म्हणजे मुझफ्फर सह नगरसेवक , पदाधिकारी , कार्यकतें आदींनी मास्क घातला नव्हता व शाररिक अंतर राखले नव्हते . 

नया नगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी महेशकुमार पाटील यांना  सदर उदघाटनाची कार्यक्रम होणार असल्याची माहिती मिळाल्या नंतर सायंकाळी ते व चव्हाण असे पोलीस कर्मचारी गेले असता पोलीस आणि इत्तर प्राधिकारी यांची परवानगी घेतली नसल्याचे आढळून आले . तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आणि मास्क घातले नसल्याचे दिसुन आले . पोलिसांच्या मनाई आदेशचे सुद्धा उल्लंघन केले गेले . त्या अनुषंगाने पाटील यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी इनामदार सह कार्यकर्त्यांवर विविध कायदे - नियमातील कलमा खाली गुन्हा दाखल केला आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरcorona virusकोरोना वायरस बातम्या