शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बदलापुरातील देहविक्री व्यवसायावर पोलिसांची धाड, दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 01:49 IST

बदलापूर येथील एका लॉजमध्ये चालणाऱ्या देहविक्रय व्यवसायावर ठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने बुधवारी सायंकाळी धाड टाकली. लॉजच्या व्यवस्थापकासह दोघांना पोलिसांनी अटक करून दोन पीडित महिलांची सुटकाही केली.

ठाणे : बदलापूर येथील एका लॉजमध्ये चालणाऱ्या देहविक्रय व्यवसायावर ठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने बुधवारी सायंकाळी धाड टाकली. लॉजच्या व्यवस्थापकासह दोघांना पोलिसांनी अटक करून दोन पीडित महिलांची सुटकाही केली.बदलापूर येथील कर्जत रोडवरील जुन्या पेट्रोलपंपासमोर असलेल्या हॉटेल वेंकिज लॉजिंगवर ठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी धाड टाकली. या चार मजली इमारतीचा तळ मजला आणि पहिला मजला हॉटेलसाठी वापरला जात होता. उर्वरित तीन मजल्यांवरील ३० खोल्यांमध्ये लॉजिंगच्या नावाखाली देहविक्रय व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास धाड टाकून लॉजचा व्यवस्थापक राकेश किसनमोहन कैथ आणि वेटर गणेश मल्लिकार्जुन कलशेट्टी यांना अटक केली. राकेश कैथ हा मूळचा पंजाबचा असून तो दोन वर्षांपासून लॉजवर कामाला होता. वेटर गणेश हा मूळचा लातूर येथील असून तो आठ महिन्यांपासून तिथे कामाला होता.या लॉजवर जवळपास तीन महिन्यांपासून अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी धाड टाकून देहविक्रय करणाºया दोन मुलींना ताब्यात घेतले. त्यापैकी एक मुलगी अंबरनाथ येथील तर दुसरी उल्हासनगरची आहे. याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे.लॉजवर चालणाºया अनैतिक धंद्याचे उत्पन्न थेट मालकाला मिळायचे. या उत्पन्नाचा निम्म्यापेक्षा कमी वाटा तो पीडित मुलींना द्यायचा. त्यामुळे मालकाचा या गुन्ह्यामध्ये थेट सहभाग असल्याने मालक आणि लॉजच्या चालकाचा शोध घेण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी न्यायालयास केली. न्यायालयाने ती ग्राह्य धरून दोन्ही आरोपींना २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :Crimeगुन्हा