शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

काशिमीरा यात्रेतील बैलगाड्यांची शर्यत, पोलीसांनी केला गुन्हा दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 20:51 IST

काशिमीरा येथील संत जेरॉम चर्चच्या यात्रेसाठी पुर्वी प्रमाणे बैलगाडी व घोडागाडीने येणारया उत्तन - गोराई आदि भागातील ग्रामस्थांना या पुढे बैल वा घोडा गाड्यांची शर्यत महागात पडणार आहे.

मिरा रोड -  काशिमीरा येथील संत जेरॉम चर्चच्या यात्रेसाठी पुर्वी प्रमाणे बैलगाडी व घोडागाडीने येणारया उत्तन - गोराई आदि भागातील ग्रामस्थांना या पुढे बैल वा घोडा गाड्यांची शर्यत महागात पडणार आहे. न्यायालयाची बंदी असताना डांबरी रस्त्यावर बैलगाड्यांचे शर्यत लाऊन बैलांना बेफाम पळवणारया दोन बैलगाडी चालकांसह अन्य ५ जणांवर काशिमीरा पोलीसांनी गुन्हा दाखल केलाय.डिसेंबर मध्ये नाताळ नंतर काशिमीरा येथील संत जेरॉम चर्चची मोठी यात्रा असते. पुर्वी पासुन भरणारया या यात्रेस त्यावेळी वाहनं नसल्याने उत्तन, डोंगरी, तारोडी, गोराई आदी गावां मधुन भाविक बैलगाडी व घोडागाडीने येत . आता डांबरी रस्ते होऊन वाहनांचा पर्याय असला तरी या भागातील ग्रामस्थ या यात्रेसाठी आधी पासुनच बैल वा घोडा गाड्यांची रंगगरंगोटी करुन सजवतात. सहकुटुंब बैलगाडी वा घोडागाडीने चर्चच्या परिसरात पोहचतात. रात्रभर मुक्काम केल्या नंतर दुसरया दिवशी आपापल्या घरी परततात. पण प्रवासात सर्रास बैलगाड्या व घोडा गाड्यांची शर्यत लावली जाते. किंवा त्या बेफाम पळवल्या जातात. या मुळे रस्त्या वरुन जाणारया अन्य वाहन चालकांची देखील भितीने गाळण उडत असते.यंदाच्या यात्रे दरम्यान देखील दोन बैलगाड्यां मध्ये रस्त्यावर लागलेली शर्यत आणि त्यात एका बैलगाडीचे चाक निखळुन झालेल्या अपघाताचा व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.एका प्राणीमित्र संस्थेने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर सोमवारी काशिमीरा पोलीसांनी या प्रकरणी दोन बैलगाड्यांचे चालक तसेच बैलगाडीत बसलेले अन्य ५ असे मिळुन एकुण ७ जणां विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.बैलगाड्यांच्या शर्यतीस उच्च न्यायालयाने बंदी घातली असताना न्यायालय व शासन आदेशाचे उल्लंघन, प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्या बाबत अधिनियम कलम ११ (१) व १ चा अ तसेच भादंविसंच्या कलम १८८, २८९ नुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. व्हिडीयोच्या आधारे काशिमीरा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

टॅग्स :thaneठाणे