शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाची पार्टी बंद केल्याने पोलीस अधिकाऱ्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 04:21 IST

नववर्षाची पार्टी बंद केल्याच्या रागातून दोघांनी पोलीस अधिका-याला मारहाण करुन एका पोलीस शिपायाच्या हाताला चावा घेतला. मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या आवारात हा प्रकार घडला असून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

उल्हासनगर : नववर्षाची पार्टी बंद केल्याच्या रागातून दोघांनी पोलीस अधिकाºयाला मारहाण करुन एका पोलीस शिपायाच्या हाताला चावा घेतला. मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या आवारात हा प्रकार घडला असून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.कॅम्प नं.-३, महापालिका टाउन हॉलमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरला पार्टी ठेवली होती. मोठ्या आवाजात गाणी लावून झिंगाट झालेले नृत्य करत होते. पहाटे ४ वाजताच्यादरम्यान मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक दाभाडे यांनी पथकासह तेथे जाऊन स्पीकर बंद केला आणि टाउन हॉलच्या व्यवस्थापकाला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणले. त्यावेळी पार्टीतील काही जण पोलीस ठाण्यात आले. याबाबत चौकशी सुरू असताना मनीष सोनावणे याने मोबाइलमध्ये चित्रीकरण सुरू करुन, आम्हाला सकाळी ५ वाजेपर्यंत परवानगी असल्याचे सांगितले.मनीष याला चित्रीकरण करण्यास पोलिसांनी मनाई केली. तसेच मादक पदार्थाची तपासणी करण्यासाठी सोनावणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याने उपनिरीक्षक दाभाडे यांची कॉलर पकडून मारहाण केली. या मारहाणीत दाभाडे यांच्या शर्टाची दोन बटणे तुटली. यावेळी दुसरा आरोपी महेश कोरडले यांनी दाभाडे यांना धरून ठेवले होते.अधिकाºयाला पोलीस ठाण्यात होत असलेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेले पोलीस शिपाई वंजारी यांच्या हाताच्या अंगठ्याला सोनावणे याने चावा घेऊन शिवीगाळ केली. तसेच सूचना फलकावर स्वत:चे डोके आपटून इजा करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात मनीष, महेश यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Policeपोलिस