शहरं
Join us  
Trending Stories
1
जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज
2
लग्नमंडपात पसरली शोककळा; मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू, 15 जखमी
3
मध्यरात्री लपून झाडांची कत्तल केल्याप्रकरणी पाेलिसांकडून पुण्यातील गेरा बिल्डरवर गुन्हा
4
आजचे राशीभविष्य: सरकारी लाभ, यश-कीर्ती वृद्धी; पद-प्रतिष्ठा वाढ, सुखकारक दिवस
5
Exit Polls चा परिणाम : आज 'मोदी स्टॉक्स'मध्ये दिसू शकते तेजी, काय म्हणताहेत एक्सपर्ट्स? जाणून घ्या
6
'या' चार राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार; भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता
7
"मला T20 World Cup बघायचाही नाही, जेव्हा मी...", रियान परागचं अनोखं विधान
8
प्रदोष शिवरात्रीचा शुभ संयोग: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता
9
पंचग्रही अद्भूत शुभ योग: ७ राशींना लाभ, लॉटरीची संधी; राजकारण्यांना यश, इच्छापूर्तीचा काळ!
10
मे महिन्यात देशभरात उष्माघाताचे ४६ बळी; तीन महिन्यांत ५६ मृत्यू, महाराष्ट्रात ११ जण मृत्युमुखी
11
पंचग्रही योग: ‘या’ ५ मूलांकांना सुख-समृद्धी काळ, धनलाभाची संधी; पद-पैसा वृद्धी, शुभ होईल!
12
अरुणाचलमध्ये भाजपच; सिक्कीम ‘एसकेएम’चेच; दोन राज्यांमधील विधानसभा निवडणूक
13
शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची उमेदवारी नक्की कोणाला?
14
WI vs PNG : हलक्यात घेऊन चालणार नाही! नवख्या संघानं वेस्ट इंडिजला घाम फोडला, कसाबसा सामना जिंकला
15
बॉम्बच्या धमकीमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, पॅरिसहून येणाऱ्या विमानात मिळाली चिठ्ठी
16
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तिहार तुरुंगात आत्मसमर्पण
17
जोकोविचला पाच सेटपर्यंत करावा लागला संघर्ष, रॉजर फेडररच्या विक्रमाशी केली बरोबरी
18
अभिनेत्री रवीना टंडनसह ड्रायव्हरला संतप्त जमावाची मारहाण
19
उद्योगपती गौतम अदानी भारतात सर्वात श्रीमंत, जगात सर्वाधिक श्रीमंतांकडे किती संपत्ती? 
20
अनिल परब आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

तोतया पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 11:51 PM

नौपाडा पोलिसांनी अटक केलेल्या एका तोतया पोलीस अधिकाºयाविरुद्ध आता ठाणेनगर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका सराफा व्यापाºयास त्याने १५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे नव्या तक्रारीतून उघडकीस आले आहे.

ठाणे : नौपाडा पोलिसांनी अटक केलेल्या एका तोतया पोलीस अधिकाºयाविरुद्ध आता ठाणेनगर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका सराफा व्यापाºयास त्याने १५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे नव्या तक्रारीतून उघडकीस आले आहे.पोलीस अधिकाºयाच्या वेशात वावरून लोकांना गंडा घालणाºया गजानन पालवे याला नौपाडा पोलिसांनी गतआठवड्यात अटक केली. जुन्या वाहनांची खरेदीविक्री करणाºया एका वितरकाची त्याने आर्थिक फसवणूक केली होती. या तक्रारीच्या चौकशीदरम्यान त्याने केलेल्या आणखी एका पराक्रमाची माहिती पोलिसांना मिळाली.ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिराजवळ असलेल्या एका सराफा दुकानामध्ये त्याने गतवर्षी काही व्यवहार केले. दुकानमालक कमलेश श्रीश्रीमाल हे ठाण्याच्या सराफा असोसिएशनचे अध्यक्ष असून व्यवहारानिमित्त त्याने त्यांच्याशी परिचय वाढवला. आपण दहशतवादविरोधी पथकामध्ये अधिकारी असल्याचे सांगून त्याने श्रीश्रीमाल यांना मोठमोठ्या अधिकाºयांचा परिचय दिला. सुरुवातीला थोडेफार दागिने उधारित घेऊन त्याने वेळेवर पैसे परत केले. दुकानमालकाचा विश्वास बसल्याची खात्री पटल्यानंतर त्याने सप्टेंबर २०१७ मध्ये १४ लाख ९५ हजार रुपयांचे दागिने घेतले. त्या मोबदल्यात त्याने धनादेश दिला होता. हा धनादेश बँकेत वटला नाही. त्यामुळे दुकानमालकाने आरोपीशी संपर्क साधला असता लवकरच पैसे परत करण्याचे आश्वासन त्याने दिले. एकदा तो पत्नीला घेऊन दुकानावर गेला. सध्या अडचण सुरू आहे, लवकरच पैसे परत करतो, असे त्याने दुकानमालकास सांगितले. दरम्यानच्या काळात नौपाडा पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक केली. याबाबतच्या बातम्या वाचल्यानंतर श्रीश्रीमाल यांना आरोपीचे खरे रूप समजले. त्यांनी यासंदर्भात तक्रार दिल्यानंतर ठाणेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :thaneठाणे