ठाणे : खेकड्याचे निळे रक्तप्रकरणी अटक केलेल्या दोघा नायजेरियन आरोपींना ६ जून, तर अब्दुल कच्छी याला ४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने शनिवारी दिल्याचे ठाणे पोलिसांनी सांगितले. निनाद तेलगोटे यांना ‘खेकड्याचे निळे रक्त’ यूकेमधील केंट फार्मास्युटिकल लिमिटेड कंपनीस पाठवण्याचे आमिष दाखवून पावणेचार लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ठाणे गुन्हे शाखेने नवी मुंबईतून अब्दुल कादीर इब्राहिम कच्छी (४०) याला अटक केली आहे.त्याने दिलेल्या माहितीनुसार,नवी मुंबईतून एजओकू संडेउर्फ स्टॅनली संडे (४१) आणि ओनकांची अॅन्थोनी मडू (४०) या दोघा नायजेरियनना अटक केली होती. शनिवारी पोलीस कोठडी संपल्याने पुन्हा दोघांना न्यायालयात हजरकेले होते़
‘त्या’ दोघा नायजेरियनना ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 23:38 IST