शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे नियम धुडकावणाऱ्या तीन हजार ७२३ रिक्षांवर ठाण्यात कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 00:43 IST

सेवा रस्त्यांवर बेकायदेशीरपणो वाहने उभी करणा:या एक हजार 335 वाहनांविरुद्ध सहा लाख 67 हजारांचा दंड आकारला असून कोरोनाचे नियम तोडून जादा प्रवाशांची वाहतूक करणा:या तीन हजार 723 रिक्षा चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केल्याची माहिती ठाणो शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

ठळक मुद्दे १८ लाख ६१ हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई सेवा रस्त्यांवरील एक हजार ३३५ वाहन चालकांना दणका

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सेवा रस्त्यांवर बेकायदेशीरपणे वाहने उभी करणाºया एक हजार ३३५ वाहनांविरुद्ध सहा लाख ६७ हजारांचा दंड आकारला आहे. तसेच कोरोनाचे नियम धुडकावून दोन पेक्षा जादा प्रवाशांची वाहतूक करणाºया तीन हजार ७२३ रिक्षा चालकांविरुद्ध १८ लाख ६१ हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी गुरुवारी दिली.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात मेट्रो लाईन चारच्या कामासाठी वाहतूकीच्या मुख्य रस्त्यांवर बॅरीकेटींग केली आहे. त्यामुळे वाहतूकीच्या रस्त्यांची रुंदी कमी होऊन सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. अशा वेळी मुख्य रस्त्याच्या बाजूलाच असलेला सेवा रस्ता वाहतूकीसाठी खुला राहणे आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये वाहतूक व्यावसायिकांनी त्यांची बंद वाहने सेवा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभी केली आहेत. त्यामुळेच सेवा रस्त्यावरील दुतर्फा वाहतूकीला अडथळे निर्माण होऊन नागरिकांना मन:स्ताप सोसावा लागतो. याबाबत वाहतूक नियंत्रण शाखेकडेही अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळेच सेवा रस्त्यावरील अनधिकृत पार्र्किं ग काढून सेवा रस्ते वाहतूकीस मोकळे करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत १ ते १८ नोव्हेंबर २०२० या कालावधीमध्ये सेवा रस्त्यावरील तब्बल एक हजार ३३५ अनधिकृत पार्र्किं ग करणाºया वाहन मालकांविरुद्ध ई चलनाद्वारे, जामर्स आणि टोर्इंग व्हॅनद्वारे वाहतूक नियंत्रण शाखेच्या विविध पथकांनी कारवाई केली. त्याद्वारे सहा लाख ६७ हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.* सेवा रस्त्यांवर दुकाने तसेच इमारतीच्या बाजूला असलेल्या भागात वाहने उभी करण्यास मुभा आहे. मात्र, महामार्गालगतच्या भागात वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. सेवा रस्ता वाहतूकीला मोकळा ठेवण्याचे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले.* रिक्षा चालकांकडूनही चालकांशेजारी तसेच मागेही दोन पेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राहण्यासाठी चालकासह तिघांनाच परवानगी आहे. त्यामुळे एका विशेष मोहीमेंतर्गत गेल्या काही दिवसांमध्ये तीन हजार ७२३ रिक्षा चालकांविरुद्ध ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या चार विभागातील १८ युनिटने दंडात्मक कारवाई केली. ही मोहीम यापुढेही सुरु राहणार असल्याचे उपायुक्त पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेtraffic policeवाहतूक पोलीसMaharashtraमहाराष्ट्र