ठाणे : दिव्याजवळील रेल्वे रुळांवर सुमारे ४ टन किलो वजनाचा लोखंडी रूळ ठेवण्याची पैज लावणारा आणि तळोजा कारागृहात चोरीच्या आरोपीखाली अटकेत असलेला मौला मकानदार याचा ताबा मिळावा, यासाठी ठाणे शहर आणि ठाणे लोहमार्ग पोलिसांनी न्यायालयात धाव घेऊन तसा पत्रव्यवहार केला आहे. यावरून, मकानदाराचा ताबा मिळवण्यासाठी आता दोघांमध्ये चुरस लागल्याचे दिसून येते. न्यायालय कोणाकडे त्याचा ताबा देणार, हे येत्या सोमवारी स्पष्ट होईल, तसेच त्याच्या ताब्यानंतर या घातपातामागे नेमकी कोणती दहशतवादी संघटना आहे किंवा नाही, हे उजेडात येईल.मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस गाडीच्या दिवा स्थानकातील मार्गात २४ जानेवारी २०१७ रोजी रूळ ठेवला होता. या वेळी एक्स्प्रेसवरील लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, यामागे दहशतवाद वा घातपाताची शक्यता वर्तवण्यात आल्याने, राष्ट्रीय तपास संस्था व राज्य दहशतवादविरोधी पथकामार्फत तपास सुरू होता. याबाबत कोणतेही ठोस पुरावे हाती लागत नसल्याने, हा तपास धिम्या ट्रॅकवर सुरू असतानाच, १३ एप्रिल रोजी ठाणे पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्यात पकडलेल्या पाच जणांच्या चौकशीत दिव्याजवळील रुळांवर लोखंडी रूळ ठेवल्याची कबुली आरोपींनी दिली. (प्रतिनिधी)दिवा रेल्वे घातपात प्रकरणमकानदार हा रेल्वेत केलेल्या चोरीप्रकरणी १७ मार्चपासून तळोजा कारागृहात आहे. त्याच्या चौकशीतून हा रूळ ठेवण्यामागचा उद्देश पुढे येणार आहे, तसेच कळंबोली, पनवेल, तळोजा, नाशिक, नांदेड, तसेच बार्शी टाकळी (अकोला) येथेही अशा प्रकारे रूळ ठेवला होता का, याबाबत उलगडा होणार आहे.
मकानदारच्या ताब्यासाठी पोलीस न्यायालयात
By admin | Updated: April 16, 2017 02:39 IST