शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

...त्या अडीच लाखांवर पोलिसांचा दावा; खातरजमा होईपर्यंत रक्कम न देण्याचा लोहमार्ग पोलिसांचा पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 3:59 AM

रेल्वेस्थानकावर एका प्लास्टिकच्या पिशवीत सापडलेली सुमारे अडीच लाखांची रोकड मुंबई पोलीस दलातील एका पोलिसाने आपली असल्याचा दावा केला आहे. ती रक्कम परत मिळावी, यासाठी त्याने सहा दिवसांनंतर ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली.

- पंकज रोडेकरठाणे : रेल्वेस्थानकावर एका प्लास्टिकच्या पिशवीत सापडलेली सुमारे अडीच लाखांची रोकड मुंबई पोलीस दलातील एका पोलिसाने आपली असल्याचा दावा केला आहे. ती रक्कम परत मिळावी, यासाठी त्याने सहा दिवसांनंतर ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच घर घेण्यासाठी पैसे घेऊन जाताना ती रक्कम गहाळ झाल्याचे त्याने निवेदनपत्रात म्हटले आहे. मात्र, अद्याप ती रक्कम त्याची असल्याची खातरजमा न झाल्याने ठाणे लोहमार्ग पोलिसांनी त्याला ती दिली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.शहापूर येथील रहिवासी विजय भेरे (४०) हे सोमवारी २० आॅगस्ट रोजी दुपारी मुंबईत काही कामानिमित्त गेले होते. काम संपल्यानंतर ते दादर रेल्वेस्थानकातून दुपारी परतीचा प्रवास करण्यासाठी कर्जत फास्ट लोकलमध्ये बसले. ठाण्यात काम असल्याने ते फलाट क्रमांक-५ वर उतरले. त्याचवेळी त्यांना फलाटावर एक पिशवी बेवारस पडलेली दिसली. ती कचऱ्याच्या डब्यात टाकण्यासाठी उचलली. डब्यात फेकणार तोच कागदपत्रे असल्याचे निदर्शनास आल्यावर कुतूहल म्हणून पिशवीत डोकावल्यावर त्यांना एक वृत्तपत्र दिसले. ते उघडून पाहिल्यावर त्यांना दोन हजार रुपयांच्या नोटांचे दोन बंडल निदर्शनास आले.ती रक्कम कुणाची तरी पडलेली असावी, म्हणून त्यांनी रेल्वे पोलीस ठाण्याचा पत्ता फलाटावर विचारून पोलीस ठाणे गाठले. तेथे त्या पैशांची मोजणी केल्यावर ते दोन लाख ३८ हजार रुपये असल्याचे स्पष्ट झाले. तसेच पोलिसांमार्फत त्या नोटा एका बँकेच्या अधिकाºयामार्फत खºया आहेत की खोट्या, याची पडताळणी केली. त्या खोºया नोटा असल्याचे बँक अधिकाºयाने सांगितल्यावरती रक्कम भेरे यांनी लोहमार्गपोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांच्या स्वाधीन केली.बदलापूर येथे घर बुकिंग करण्यासाठी जाताना रक्कम झाली गहाळदरम्यान, पोलीस पैसे पडल्याची कोणती तक्रार कोणत्या पोलीस ठाण्यात दाखल आहे का, याचा आढावा घेत होते. मात्र, तशी कोणतीच तक्रार नाही. पण, सहा दिवसांनी एक व्यक्ती लोहमार्ग पोलीस ठाण्यात धडकली आणि आपले पैसे गहाळ झाल्याचे सांगू लागली.ती व्यक्ती पोलीस असून बदलापूर येथे घर बुकिंग करण्यासाठी पैसे भरण्यासाठी जात होतो. त्यावेळी ती रक्कम गहाळ झाल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत पोलिसांनी लेखी लिहून देण्यास सांगितल्यावर तसेच लेखी लिहून दिले आहे.मात्र,जोपर्यंत त्याबाबत खातरजमा होत नाही. तोपर्यंत ती रक्कम दिली जाणार नसल्याचा पवित्रा लोहमार्ग पोलिसांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे