शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाच जिल्ह्यांतून तडीपार केलेल्या गुंडाला ठाणे पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 23:27 IST

ठाणे जिल्हा, मुंबई, मुंबई उपनगरे, रायगड आणि पालघर या पाच जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या संदीप राजनाथ उपाध्याय ऊर्फ छोटू (२१) या गुंडाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने नुकतीच अटक केली आहे.

ठळक मुद्देउल्हासनगर येथून घेतले ताब्यात खंडणीविरोधी पथकाची कारवाईपोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले होते आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : उल्हासनगर येथून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या संदीप राजनाथ उपाध्याय ऊर्फ छोटू (२१, रा. कमला नेहरूनगर, उल्हासनगर) या गुंडाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने नुकतीच अटक केली आहे. त्याच्यावर उल्हासनगर क्रमांक एक पोलीस ठाण्यात महाराष्टÑ पोलीस कायदा कलम १४२ नुसार कारवाई केली आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातून फरारी तसेच तडीपार झालेल्या गुंडांवर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर खंडणीविरोधी पथक उल्हासनगर भागात गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग करीत असताना ठाणे जिल्ह्यातून हद्दपार केलेला संदीप उपाध्याय हा गुंड उल्हासनगर क्रमांक एक येथील कमला नेहरूनगरातील शिवसेना कार्यालयाजवळ फिरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना मिळाली होती. त्याआधारे या पथकाने ३० सप्टेंबर रोजी त्याला या भागातून ताब्यात घेतले. त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यामुळे त्याला १९ नोव्हेंबर २०१८ रोजी उल्हासनगरचे तत्कालीन पोलीस उपायुक्त यांनी ठाणे जिल्हा, मुंबई, मुंबई उपनगरे, रायगड आणि पालघर या पाच जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. त्याला तडीपार केलेले असतानाही तो याच भागात बिनधास्तपणे बेकायदेशीरपणे वास्तव्य करीत होता. तो ठाणे जिल्ह्यात विनापरवानगी आल्याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाने त्याला अटक केली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक