शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात स्पा-मसाजपार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 21:53 IST

एका नामांकित हॉटेलमधील इमारतीमध्ये स्पा आणि मसाजपार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणा.या प्रसाद शंकरन (४८, रा. मरोळ, मुंबई) या स्पाचालकाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने बुधवारी अटक केली.

ठळक मुद्देपाच तरुणींची सुटकाठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वागळे इस्टेट येथील एका नामांकित हॉटेलमधील इमारतीमध्ये स्पा आणि मसाजपार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणा-या प्रसाद शंकरन (४८, रा. मरोळ, मुंबई) या स्पाचालकाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने बुधवारी अटक केली. त्याच्या तावडीतून पाच पीडित तरुणींची सुटका केली आहे.वागळे इस्टेट येथील ‘हॉटेल शरणम्’च्या पाचव्या माळ्यावर ‘केरळ आयुर्वेदिक ट्रीटमेंट सेंटर’ नावाचे स्पा चालविले जाते. या स्पामध्ये मसाजपार्लरच्या नावाखाली काही तरुणींकडून शरीरविक्रयाचा व्यवसाय करून घेण्यात येत असल्याची माहिती ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांना मिळाली होती. त्या आधारे कडलग यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक शीतल मदने यांच्या पथकाने १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास या स्पावर छापा टाकला. यावेळी काही तरुणींना पैशांचे आमिष दाखवून ग्राहकांशी शरीरसंबंध ठेवण्यास प्रवृत्त केले जात असल्याचे आढळले. ग्राहकांकडून पाच ते दहा हजार रुपये घेऊन या तरुणींना त्यातील काही वाटा देण्याचे आमिष दाखविले जायचे. हे सेक्स रॅकेट चालविणा-या शंकरन याला या पथकाने अटक केली असून त्याच्या तावडीतून पाच तरुणींची सुटका केली आहे. त्यांच्याकडून रोकड आणि काही सामग्री हस्तगत केली आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीSex Racketसेक्स रॅकेट