ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या ‘कृष्णा प्लाझा’ या तीन मजली इमारतीमध्ये सोशल क्लच्या नावाखाली चालणा-या जुगाराच्या अड्ड्यावर नौपाडा पोलिसांनी मंगळवारी पहाटे १ ते ४ वाजण्याच्या दरम्यान धाडसत्र राबविले. या कारवाईमध्ये अमजद खान याच्यासह ८९ जणांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले, निरीक्षक लता शेरेकर यांच्यासह १५ जणांच्या पथकाने ‘कृष्णा प्लाझा’ या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील या ‘संगम सोशल क्लबवर टाकलेल्या धाडीत जुगाराच्या सामुग्रीसह एक लाख २५ हजारांची रोकडही जप्त केली. या कारवाईत खान याच्यासह दत्ता पाटील, लालचंद सोनार, जयवंत भालेराव, काशीप्रसाद जयस्वाल, गणेश साव आणि प्रविण देशपांडेसह ८९ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध महाराष्टÑ जुगार कायदा ३ आणि ४ प्रमाणे नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची ठाणे न्यायालयाने वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील एका इमारतीमधील जुगार अड्डयावर पोलिसांची कारवाई: ८९ जुगाऱ्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 23:48 IST
ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिलेल्या आदेशानुसार ठाणे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या ‘कृष्णा प्लाझा’ या तीन मजली इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील जुगाराच्या अड्डयावर नौपाडा पोलिसांनी मंगळवारी छापा टाकला. जुगाराच्या सामुग्रीसह एक लाख २५ हजारांची रोकड जप्त करण्यात आली.
ठाण्यातील एका इमारतीमधील जुगार अड्डयावर पोलिसांची कारवाई: ८९ जुगाऱ्यांना अटक
ठळक मुद्देनौपाडा पोलिसांनी राबविले धाडसत्र सव्वा लाखाची रोकड जप्तठाणे स्थानकानजिकच होता अड्डा